हरभजनची आयपीएल मधून माघार

दोन दिवसांपूर्वी हरभजन हा यावर्षीच्या आयपीएल मधून माघार घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. खासगी कारण देऊन हरभजनने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

 सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हरभजनने चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला आपण यंदाच्या हंगामात खेळू शकणार नसल्याचं कळवलं आहे. सुरुवातीला आईच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी हरभजन दोन आठवडे उशीरा युएईत दाखल होणार होता. १ सप्टेंबरपर्यंत हरभजन सिंह युएईत दाखल होणं अपेक्षित होतं. परंतू ती वेळ निघून गेल्यानंतर हरभजनने माघार घेण्याचं ठरवलंय.

आधी डझनभर स्टाफ कोव्हिड पॉझिटिव्ह आणि नंतर स्टार फलंदाज सुरेश रैना याने आयपीएल मधून माघार घेतल्यानंतर ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नई संघातील अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंगनेही बॅंक आऊट करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2020 मधून वैयक्तिक कारणास्तव हरभजन सिंगने माघार घेतली आहे. त्याने शुक्रवारी आपला निर्णय चेन्नई सुपरकिंग्जला कळवला.

यंदाच्या आयपीएलमधून वैयक्तिक कारण दाखवत आपले नाव मागे घेणारा सुरेश रैनानंतर तो सीएसकेचा दुसरा खेळाडू ठरला. टीमबरोबर यूएईला प्रवास करुन रैना मायदेशी परतला होता, तर हरभजन भारतातच आहे.

दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड वगळता ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ संघातील सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दोघे बाधित खेळाडू 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी देतील. कोरोना संसर्गामुळे सीएसके संघाचे प्रशिक्षण उशिरा सुरु झाले

तीन वेळा चॅम्पियन्स ठरलेले ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ 21 ऑगस्ट रोजी आयपीएलमधील गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसह यूएईमध्ये दाखल झाले होते. एमएस धोनीकडे नेतृत्व असलेल्या सीएसकेने यूएईला जाण्यापूर्वी चेन्नईत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

 मुंबई इंडियन्सच्या लसित मलिंगानेही या वर्षी स्पर्धा खेळणार नसल्याचे सांगितले आहे. 

Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image