दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’

लातूर : कोव्हिड -19 च्या लॉकडाऊनच्या काळात बी.ए.तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना मंगळवार    दि.26.05.2020 रोजी ऑनलाईन निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, कार्यालयीन अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून सुसंवाद साधला. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष्‍ निरोप समारंभ आयोजीत करता येत नसल्यामुळे महाविद्यालयाच्या संदर्भातील कृतज्ञता भावना व्यक्त करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला होता. त्यास अनुरूप महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यास ऑनलाईनच्या माध्यमातून निरोप संमारंभाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यात बी.ए.तृतीय वर्षातील अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यकत केली. त्यात मनोज अत्राम, निळकंठ पुजारी, ज्योतिबा बडे, विष्णू चांदूरे, सुनिल पवार, कु. आयशा पठाण आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मनोगत पर अभिभाषणामध्ये महाविद्यालयांनी त्यांच्यावर केलेले संस्कार, त्यांच्या जिवन-जडणघडणे मध्ये महाविद्यालयाचे असलेले योगदान याबद्दल भावनास्पद मनोगते व्यक्त केली. 



ऑनलाईन निरोप समारंभाच्या अध्यक्षीय मनोगतात प्र.प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड यांनी असे प्रतिपादन केले की, ऑनलाईन निरोप संमारंभ घेण्याचा कदाचीत पहिला मान आपल्याच महाविद्यालयास मिळालेला आहे. लॉकडाऊन मध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुसंवाद सांधता येत नसला तरी इंटनेटच्या माध्यमातून अनेक माहीती विद्यार्थ्यां पर्यंत पोहंचवण्याचे काम महाविद्यालयाने कले आहे. विशेषता: सॅनीटाईजर व मास्क वितरण, विद्यार्थी – पालक मनोबल संवाद अभियान, गरजू विद्यार्थ्यांना राशन किट यासारखी मदत महाविद्यालयांनी केली असून, दयानंद शिक्षण संस्थेने सुरू केलेल्या ऑनलाईन उपक्रमाची दखल महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंत्री  श्री. उदय सामंत यांनी घेतल्याचे प्रतिपादन या प्रसंगी केले. तसेच त्यांनी ऑनलाईन लर्नींग व टिचींग उपक्रमाबद्दल सखोल अशी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासंदर्भात शुभेच्छा देऊन लॉकडाऊन नंतर पुन्हा संधी प्राप्त झाल्यास पारंपारीक पध्दतीने निरोप संभारंभ देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांनी केले या प्रसंगी डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य प्रा. अनिलकुमार माळी व राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. नवनाथ भालेराव यांनी मार्गदर्शन केले. तर अभार प्रदर्शन प्रा. अनिलकुमार माळी यांनी मांडले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. माने योगेश, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा. सचिन पतंगे, प्रा. इरफान शेख, मंगेश रापते, प्रा. महेश जंगापल्ले, प्रशासकीय कर्मचारी श्री. विकास खोगरे, श्री. गोविंद मुंडे, श्रीमती निर्मला दहिरे, श्रीमती चंद्रकला आदमाने आदींनी परिश्रम घेतले.


Popular posts
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image