प्रथमच आयपीएलमध्ये खेळणार एक अमेरिकन क्रिकेटपटू !


आतापर्यंत आयपीएलमध्ये अमेरिकेचा एकही क्रिकेटपटू खेळलेला नव्हता. पण यावर्षीच्या आयीएलच्या हंगामात पहिल्यांदाच अमेरिकेचा एक खेळाडू पाहायला मिळणार आहे. आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून अली खान हा अमेरिकेचा खेळाडू खेळणार आहे.


कोलकाताच्या संघातील हर्नी गुर्ने या वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली होती. अली खान हा एक वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे हर्नीच्या जागी आता अमेरिकेच्या या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आले आहे. अमेरिकेध्येही क्रिकेटचा चांगला प्रसार करण्यात आला आहे. पण अमेरिकेचा एकही खेळाडू आतापर्यंत आयपीएलमध्ये पाहायला मिळाला नव्हता.


अली हा कॅरेबियन प्रीमिएर लीगमध्ये त्रिनबागो नाइट राइडर्स या संघातून खेळत होता. त्रिनबागो नाइट राइडर्स या संघाने यावेळी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्रिनबागो नाइट राइडर्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही संघांचा मालक हा शाहरुख खान आहे.



अली हा एक वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे यावर्षी तो कोलकात्याच्या संघातील सरप्राइज पॅकेज ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. वेगवान गोलंदाजीसाठी अली हा ओळखला जातो. त्याचबरोबर अली हा भन्नाट यॉर्कर टाकतो, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये अली संधी मिळणार का आणि तो या संधीचे सोने करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल.


Popular posts
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image