नायगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपणासह झाडांचा वाढदिवस साजरा

 नायगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम व झाडांचा वाढदिवस तसेच वृक्षलागवडीचा वसा घेत जिल्हा परिषद शाळेत वृक्ष लागवड करण्यात आली.


       या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती संगीता वाघे सरपंच वनमाला पाटील, राजाभऊ पाटील, माहदेव मेनकुदळे,शरद शितोळे बालाजी खोत,शिवाजी शिंदे, गोविंद वाघे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, व्हि.आर.पाटील सदस्य,मुख्याध्यापक, शिक्षक विश्वनाथ रेनेवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. 



   या वेळी शाळेत लावण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला त्याच बरोबर गत वर्षीच्या आलेल्या झाडांचा वाढदिवस उत्साहातसा जरा केला या वृक्षरोपनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थीनी शाळेत एकत्र येऊन या पुढील काळात मुलांना व शाळा सुविधा गुणवत्ता वाढीचा वसा घेतला मुख्यध्यापक रमेश नाईकवाडी यांनी वृक्षरोपणाचे महत्व सांगून सर्वांचे आभार मानले


"मागील वर्षी लावलेली झाडे जगली त्याचा आम्हाला खूप आनंद झाला यावर्षी लावलेली झाडे देखील आम्ही सगळेजण मिळून चांगल्या प्रकारे जगवू",मुख्यध्यापक रमेश नाईकवाडी. 


"याआधी शाळेत लावलेल्या झाडांची योग्य निघा घेतल्याने शाळेतील लावलेली झाडे जगली या पुढे रोपांसाठी लागणारे ठिबक सिंचन आम्ही करुन देणार",महादेव मेनकुदळे माजी विद्यार्थी. 



Popular posts
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image