मुघल संग्रहालयाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीसंदर्भातील दस्तऐवजदेखील बघायला मिळणार
आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्याची घोषणा योगी आदित्यनाथ केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. हा १५० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. या ट्विटमध्ये योगींनी म्हटले आहे, ‘आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेचे प्रतिक असलेल्या चिन्हांना कुठलेही स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिन्द, जय भारत.’
या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू आणि दस्तावेजदेखील असतील. यापूर्वी लखनौचे मुख्य पर्यटन सचिव जितेंद्र कुमार यांनी पर्यटन अधिका-यांना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या संग्रहालयात गॅलरी तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. या गॅलरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीसंदर्भातील दस्तऐवजदेखील बघायला मिळतील.
फडणवीसांकडून कौतुक
योगी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच या निर्णयाचे स्वागत केले. फडणवीस यांनी योगींचे ट्विट रीट्विट करत शिवरायांचा जयजयकार केला. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, असे ट्विट करत फडणवीस यांनी योगी सरकारचे कौतुक केले.
----------------------------------------------------
'आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार'- मदन शर्मा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं आक्षेपार्ह कार्टुन व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती.
मदन शर्मा यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार असल्याचं सांगत राज्यात गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचंही म्हटलं आहे.
या मुद्द्यावरून भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला असतानाच शर्मा यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना आता आपण संघ आणि भाजपसाठी काम करणार आहोत. आता गुंडगिरी खपवून घेणार नाही. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पुनरुच्चारही केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते.
काही माजी सैनिकांनीही शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय सैनिक संस्था या निवृत्त सैनिकांच्या संघटनेनेही शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे मुंबई अध्यक्ष पंजाबराव लक्ष्मण मुधाने यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर येत्या तीन दिवसात सर्व निवृत्त अधिकारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.
----------------------------------------------------
----------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 206 RTPCR अहवालांपैकी 97 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 56 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 53 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 510 Rapid Antigen Test पैकी 116 रुग्ण पॉझिटिव्ह तर 394 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 213 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 8958 झाली आहे तर 6641 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2056 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 261 वर पोहोचला आहे.
----------------------------------------------------