आम्ही दिवस-रात्र एक करुन मराठा आरक्षण दिले मात्र, प्रत्येक बाबतीत या सरकारने दुर्लक्ष केले: फडणवीस
"राज्य सरकारने दाखविलेल्या बेपर्वाईचा, असंवेदनशील हाताळणीचा हा परिपाक आहे"
“मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेल्या कालखंडात या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या गेले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने योग्य कारवाई केली असती तर या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते. पण, हे सरकार प्रारंभीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नव्हते आणि आज त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे”, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
“आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिवस-रात्र एक करुन परिश्रम घेतले. केवळ विधिमंडळात कायदे करुन ते टिकविता आले नसते, हे लक्षात घेऊन राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला. आरक्षणाच्या संपूर्ण राज्यभर झालेल्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तेव्हा तेथे प्रयत्नांची शर्थ करुन ते आरक्षण टिकविले. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो आहोत.”
“राज्य सरकारने दाखविलेल्या बेपर्वाईचा, असंवेदनशील हाताळणीचा हा परिपाक आहे. प्रारंभीपासूनच न्यायालयीन प्रत्येक बाबतीत या सरकारने दुर्लक्ष केले. कधी वकिल हजर झाले नाही, तर कधी वेळेत आवश्यक परिपूर्ती केली गेली नाही. मागासवर्ग आयोग 7 महिन्यांपासून गठीत केलेला नाही. यासाठी आपण पत्रव्यवहार सुद्धा केला. पण, सरकारने त्यालाही दाद दिली नाही. असे असले तरी मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात आपण त्यांच्यासोबत आहोत. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करु. या लढ्यात ते एकटे नाहीत. आम्ही सारे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
----------------------------------------------------
जलयुक्त शिवारची कामे निकृष्ट दर्जाची, कॅगचा ठपका ; फडणवीसांसाठी मोठा धक्का.
अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर या जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली नाही.
जलयुक्त शिवार ही योजना असफल ठरली आहे, असा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. या योजनेवर 9 हजार 634 कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचा गंभीर ठपका कॅगने ठेवला आहे.
जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील गावं दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट हे सफल न झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. या योजनेवर 9 हजार 634 कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचे कॅगने म्हटलं आहे. कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्याने हा फडणवीसांसाठी मोठा धक्का मानला जातं आहे.
हे अभियान राबवलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात अपयश आल्याचा निष्कर्ष कॅगने मांडला आहे. तसेच अभियान राबवलेल्या गावात पिण्याचे पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकर सुरु असल्याचे कॅगने निदर्शनास आणले आहे. जलयुक्त शिवारच्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी कोणतीही कार्यपद्धती अवलंबली नाही. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कॅगने पाहणी केलेल्या 120 गावांपैकी एकही गावांमध्ये दुरुस्ती आणि देखभालीसाठी राज्य सरकारने अनुदान दिले नाही.
चार जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर या जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली नाही. या कामासाठी 2 हजार 617 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. जलयुक्त शिवारची अनेक काम निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असा ठपका कॅगने ठेवला आहे. पाण्याची साठवण निर्मिती कमी असतानाही गावे जलपरिपूर्ण म्हणून घोषित केल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. जलयुक्त शिवार योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे भूजल पातळीत वाढ करणे होते. पण अनेक गावांमध्ये वाढ होण्याऐवजी भूजल पातळी घटल्याचे निदर्शनास आले. या योजनेतंर्गत केलेल्या कामाचे फोटोग्राफ वेबसाईटवर अपलोड केले गेले नव्हते. अनेक कामांचे त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन झाले नाही. देवेंद्र फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार योजनेबाबत अहवाल कॅगने ठेवला आहे.
----------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 306 RTPCR अहवालांपैकी 85 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 195 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 26 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 782 Rapid Antigen Test पैकी 157 रुग्ण पॉझिटिव्ह तर 625 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 242 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 7657 झाली आहे तर 4869 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2568 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 220 वर पोहोचला आहे.
-----------------------------------------------------