“प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना पुण्यात बेडच मिळत नाही. यंत्रणेवर कोणाचंही नियंत्रण नाही. अधिकारी नेमकं काय करतात? कोणालाच कळत नाही”, अशा तक्रारी आमदार आणि खासदारांनी प्रकाश जावडेकर आणि शरद पवार यांच्याकडे केल्या.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांनी तक्रारींचा पाढा वाचला.
या बैठकीनंतर पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि शरद पवारांनी बैठक घेतली याचा अर्थ आम्ही अपयशी ठरलो असा होत नाही. कारण ते पुण्याचेच नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आढावा बैठक घेतली. दोघांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत. त्या सूचना आम्ही अंमलात आणू. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये काही त्रूटी आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्याबाबतीत जे घडलं ते चुकीचं घडलं”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.
“पुण्याच्या सद्यस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठकी पार पडल्या. जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये सुविधांची कमतरता आहे. हा मुद्दा मांडला. यात खोटं बोलणाऱ्यावर कारवाई करा. कारण सध्या 330 बेडंस उपलब्ध असल्याचं आधी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे म्हणाले होते. पण नंतर त्यांनी असं बोललोच नाही, असं स्पष्टीकरण दिलं”, असं मुरलीधळ मोहोळ यांनी सांगितलं.
----------------------------------------------------
राज्यात आज तब्बल 20,489 रुग्णांची भर ,
10,400 रुग्ण बरे होऊन परतले घरी ,
315 मृत्यु
----------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 268 RTPCR अहवालांपैकी 86 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 136 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 16 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 522 Rapid Antigen Test पैकी 109 रुग्ण पॉझिटिव्ह तर 389 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Test Rapid Antigen Test दोन्ही मिळून 195 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6769 झाली आहे तर 4352 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2215 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 202 वर पोहोचला आहे.
-------------------------------------------------------