पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन//धनगर समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन//काळरूपी राक्षस//लातुर 358 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 153 नवीन बाधित

पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन


सतत पाऊस होत असून यामूळेही काही ‍ठिकाणी पुर/क्षेत्र जलमय होऊन पिकांचे नुकसान होत आहे. यानुषंगाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
 ज्या शेतकऱ्यांचे उपरोक्त  नमूद कारणाने नुकसान झालेले आहे असा कोणताही शेतकरी पंचनाम्यामधून सूटणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत तालुका कृषि अधिकारी व विमा कंपनीस सूचना दिलेल्या आहेत. यासोबतच जिल्हयामध्ये पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तीक  शेतातील पिकाचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने पिक नुकसान पूर्वसुचना देण्याकरीता सुचिधा उपलब्ध्‍ आहे.



पिक विमा योजनेमध्ये शेतात पाणी थांबून राहील्यामुळे झालेले नुकसान व पूराचे पाणी शेतात घूसल्याने झालेले नुकसान या दोन बाबींमुळे झालेले नुकसानी संदर्भात भरपाई मिळू शकते.ज्या शेतकऱ्यांचे वरील कारणाने नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.ऑफलाईन अर्जासाठी प्रत्येक तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये विमा कंपनीचा प्रतिनिधी उपलब्ध्‍ आहे. या संबंधाने शेतकरी या प्रतिनिधीकडे अर्ज करु शकतात.अर्जासोबत पिक विमा भरल्याची पावती व 7/12 उतारा कागदपत्र सादर करावीत.
शेतकरी ऑफलाईन अर्ज बँक/ महसूल विभाग /कृषि विभाग यांच्याकडेही करु शकतील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  Crop Insurance मोबाईल ॲपचा वापर करुन नुकसानीची सूचना देता येईल. ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत ऑफलाईन /ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकरी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.


 ------------------------------------------------------------


आरक्षण प्रश्नी धनगर समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून आंदोलन



--------------------------------------------------------


काळरूपी राक्षस मानगुटीवर बसलाय, सावध रहा!... 


आधी कोरोना पॉझिटीव्हच्या बातम्या यायच्या, आता अनेक परिचित, नातेवाईक माणसांच्या मृत्यूच्या बातम्या कानावर येवू लागल्या आहेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. पैसेवाले खाजगी दवाखान्यात उपचार घेताहेत. गरीबाला हॉस्पिटल, बेड मिळत नाही. माणूस मरतोय, त्याला परस्पर जाळलं जातंय. स्मशानभूमीत नंबर लागलेत. प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिलं जात नाही. तिसरा नाही ना तेरावा नाही. राख सुद्धा सावडायला मिळत नाही. एक पेशंट सापडला की सगळं घर कोरोना पॉझिटिव्ह होतंय. कितीही काळजी घेतली तरी  संसर्ग न होणं आता माणसाच्या हातात राहिलेलं नाही. कितीही खबरदारी घेतली तरी कोरोना होणार नाही याची शाश्वती उरलेली नाही. कहर माजलाय. घराभोवतीने वणवा लागावा अन आपलं घर वणव्याची वाट बघत तटस्थ उभं असावं अशी परिस्थिती निर्माण झालीय.



जीवावर उदार होवून पोटापाण्यासाठी बाहेर पडायचं. कोरोनाची धास्ती घेऊन माघारी घरी यायचं. सगळं कुटूंब दगावण्याची भीती काळजात कळ मारत राहतेय. आधी कोरोना शहरा शहरात सापडायचा, आता वार्डा वार्डात सापडतोय. खेडोपाडी, वाड्या वस्त्यावरची माणसं उचलून दवाखान्यात भरती केली जात आहेत. मेलेला माणूस घरापर्यंत येत नाही, शिल्लक माणसांना चौदा दिवसाचा विजनवास पदरी येतोय. कोरोना ग्रस्त सापडला तरी आता त्याला घरातच डांबून ठेवलं जातंय. उपचार नाहीत, औषधे नाहीत. जगला तर जगला, मेला तर मेला. सगळीकडे सगळ्याचाच तुटवडा आहे. आभाळ फाटलंय, ठिगळं लावायला जागा उरली नाही. बिकट परिस्थिती आहे. ज्याचं जळतंय त्यालाच फक्त कळतंय. बाकीचे सगळे खुशाल आहेत, गाफील आहेत. जात्यासाठी आपला अजून नंबर  आलेला नाही या मिथ्या समाधानात सुपातले मश्गूल आहेत. कुणाचे सांत्वन करायचे, कुणाला धीर द्यायचा..? अजून मेलो नाही म्हणून जिवंत आहे असे म्हणायची वेळ आलेली आहे.


गावाकडे आईवडील रामभरोसे आहेत. वाईट बातमी येवू नये म्हणून रोज त्या  देवाचा धावा करायचा. पहाटे पहाटे मोबाईल खणखणू नये म्हणून त्या संकल्पनेतील विधात्याची करुणा भाकायची. जणू फिल्टर लावलाय. रोगीष्ट, आजारी, गळून गेलेले, पिकून गळून पडायला आलेले, ब्लड प्रेशर, शुगरने पोखरलेले या तडाख्यात सापडले की पुन्हा उठत नाहीत. तारुण्य, प्रतिकारशक्ती, धडधाकट प्रकृती, सगळ्या गैरसमजूती आहेत. कोरोनाच्या तुम्ही नजरेत भरला की कोरोना तुम्हाला उचलून न्हेणार! कसला निकष नाही की कसला क्रायटेरिया नाही. जगतील ते जगतील, मरतील ते मरतील, सरधोपट गणित आहे, कसलंही लॉजिक नाही. काळजी घ्या, नका घेऊ. तुमच्या हातात तुमचं जगणं उरलेलं नाही. वणवा विझवायला आगीचे बंब पाठवण्याऐवजी आम्ही रॉकेल भरलेले टॅंकर पाठवतोय. सगळंच अनलॉक करुन ठेवलंय, जणू मृत्यूचं श्वापदच खुलं केलंय. आम्ही मृत्यू अनलॉक केलाय. घराबाहेर कुणी सुरक्षित नाही, काही दिवसातच घरेपण असुरक्षित होतील. मृत्यू चुकवणं अवघड होऊन जाईल. सगळंच बेभरोसे होईल. मेलो नाहीच तर जिवंत राहू...


म्हणून अजुनही वेळ गेलेली नाही! सावध व्हा! आपणास डायबेटीस, बीपी, कँसर, किडनीचे आजार असतील तर घरातच रहा! गर्दीत, लग्नात, मयतीस, दहाव्यास जणे टाळा!अगदी  आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा! तोंडाला रुमाल किंवा मास्क लावा! नियम पाळा! लस येईपर्यंत....!!!
     एकदा विचार करा,
तुमचा कुटुंबातील सदस्य


 ----------------------------------------------------


लातूर जिल्हा :


आज प्राप्त झालेल्या 421 RTPCR अहवालांपैकी 263 अहवाल निगेटिव्ह आले असून 150 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 865 Rapid Antigen Test पैकी 208 रुग्ण पॉझिटिव्ह तर 657 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.  RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 358 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 15945 झाली आहे, तर 12310 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2145 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1031 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 459 वर पोहोचला आहे.


--------------------------------------------------


उस्मानाबाद जिल्हा :




आज प्राप्त झालेल्या 160 RTPCR अहवालांपैकी 49 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 105 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 06 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 520 Rapid Antigen Test पैकी 104 रुग्ण पॉझिटिव्ह तर 416 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 153 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 11215 झाली आहे तर 8422 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2461 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा  332 वर पोहोचला आहे.


 




Popular posts
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
कोरोना रिपोर्ट चा घोळ अन् नगरच्या तरुणाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र ! आज लातूर जिल्हा141 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 104 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.
Image