"उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अयशस्वी मुख्यमंत्री,त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं” ।। तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली ।। लातुर 347 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 170 नवीन बाधित


उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अयशस्वी मुख्यमंत्री : डॉ.निखिल आनंद


शिवसेनेनं आपलं नाव बदलून ‘बाबर सेना’ करावं


उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात ‘अयशस्वी’ मुख्यमंत्री आहेत, असं म्हणत निखिल आनंद यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेनं आपलं नाव बदलून ‘बाबर सेना’ करावं, असा टोलाही निखिल आनंद यांनी शिवसेनेला लगावला आहे.  तसेच यशस्वी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं, असं निखिल आनंद यांनी म्हटलंय.


मुंबई महानगर पालिकेने अभिनेत्री कंगणा राणावतच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई केली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली. पालिकेच्या या कारवाईवरून बिहार भाजपचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.



डॉ.निखिल आनंद, बिहार भाजपचे प्रवक्ते 


दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतके खालच्या पातळीवर जाणारे राजकीय व्यक्ती असतील हे देशाच्या जनतेला माहीत नव्हतं. गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत बडबड करत आहेत आणि सोबतच मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका पक्षपाती कारवाई करत आहेत, ती थेट उद्धव ठाकरेंच्या निर्देशावरून आणि इशाऱ्यावरूनच होत आहे, असं निखिल आनंद यांनी म्हटलं आहे.


----------------------------------------------------


तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली 


 नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावरून बदली करत तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणचा कारभार देण्यात आला होता . कोरोनातून बरे झान्यानंतर मुंढे यांनी अद्याप या प्राधिकरणाचे सचिवपद स्वीकारलेले नाही. तोपर्यंत राज्य सरकारने त्यांची पुन्हा बदली केली आहे. तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणाचा कार्यभार देण्यात आला होता. याठिकाणी रुजू होऊ नका , असा संदेश राज्य सरकारने दिला आहे . तर मुंबई जीवन प्राधिकरणचा अतिरिक्त कार्यभार मदत व पुनर्वसनचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने आज दिले आहेत. एम.जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर तसेच ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त ,विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे .


तुकाराम मुंढे यांना कोणते पद मिळणार ते जाहीर केलेले नाही .त्यांच्याकडे आता कोणती जबाबदारी देण्यात येणार याबद्दल उत्सुकता आहे .



----------------------------------------------------


लातूर जिल्हा :




 आज प्राप्त झालेल्या 313 RTPCR अहवालांपैकी 227 अहवाल निगेटिव्ह आले असून 72 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 1198 Rapid Antigen Test पैकी 275 रुग्ण पॉझिटिव्ह तर 923 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 347 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

 

 जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 11334 झाली आहे, तर 7935 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2530 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 530 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 339 वर पोहोचला आहे.

 



----------------------------------------------------



उस्मानाबाद जिल्हा :


  आज प्राप्त झालेल्या 271 RTPCR अहवालांपैकी 82 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 165 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 24 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 438 Rapid Antigen Test पैकी 88 रुग्ण पॉझिटिव्ह तर 350 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.


RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 170 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 7856 झाली आहे तर 5231 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2400 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 225 वर पोहोचला आहे.







-----------------------------------------------------






Popular posts
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image