विधिमंडळ सभागृहात शिवसेना आक्रमक
मुंबई : “अर्णव गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत, स्वत: निकाल देत आहेत” अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात अस घटना म्हणते. अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचं का?” असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.
अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा घणाघाती आरोप करत विधिमंडळ अधिवेशना दरम्यान शिवसेना सभागृहात आक्रमक झाली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.
“अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी” अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.
दरम्यान शिवसेना सभागृहात आक्रमक झाली त्यानंतर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
----------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद :- आज प्राप्त झालेल्या 333 RTPCR अहवालांपैकी 88 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 235 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 10 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 662 Rapid Antigen Test पैकी 123 रुग्ण पॉझिटिव्ह तर 539 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Test Rapid Antigen Test दोन्ही मिळून 211 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 7397 झाली आहे तर 4748 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2433 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 216 वर पोहोचला आहे.
-----------------------------------------------------