ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न - अनिल देशमुख
राज्यातील काही पोलीस अधिकार्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. पण, आता अनिल देशमुख यांनी याबद्दल वेगळाच खुलासा केला आहे.
अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या तोंडी हे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने टाकले असल्याचा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात अनौपचारिक भेट देशमुख यांनी दिली. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा इन्कार करताना देशमुख म्हणाले, एका वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली ती निराधार आहे. मी असं कुठेही म्हटलो नाही. या मुलाखतीचा व्हिडीओ यूट्युबवर उपलब्ध आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला तर वस्तुस्थिती लक्षात येईल.
काय म्हणाले होते अनिल देशमुख?
चार ते पाच वरिष्ठ अधिकारी यात एका महिला अधिकार्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले.
पोलीस अधिकार्यांची नावे जाहीर करा...?
एवढंच नाहीतर, शरद पवारांनी एका महिला अधिकार्याचे नाव घेतले. त्यानंतर तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले. त्याच बरोबर चार अधिकार्यांची नावही सांगितली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावलं उचलत काही अधिकार्यांना बाजूला सारले. तर काही अधिकारी अजूनही पदावर कायम आहे. अशा अधिकार्यांना तातडीने बाजूला हटवायला पाहिजे होते, अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केली होती.
----------------------------------------------------
केंद्र सरकारने शेती क्षेत्राशी संबंधित तीन अध्यादेश आणले होते ज्यांचं रुपांतर आता कायद्यात करण्यात आलं ती विधेयकं शेतकर्यांसाठी नेमकं काय करू पाहतायत, हे विधेयक कसं आहे
* पहिलं विधेयक शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक.
हे विधेयक कृषीमालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतं. यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत - कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री
कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे, मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकर्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे
इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे
* दुसरं विधेयक - शेतकर्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्याही काही प्रमाणात अशाप्रकारची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल ५ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्यांना कंत्राटांचा फायदा होईल. बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकर्यांवर नाही त्यांच्या कंत्राटदारांवर राहील. मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात
* अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक हे तिसरं विधेयक आहे ज्यावरून वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलाय. याच्या तरतूदी काय आहेत? डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणे. यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत. अपवाद: युद्धसदृश असामान्य परिस्थिती निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल किमती स्थिर राहण्यात मदत होईल. ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा.
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 190 RTPCR अहवालांपैकी 40 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 133 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 17 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 592 Rapid Antigen Test पैकी 128 रुग्ण पॉझिटिव्ह तर 464 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 168 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 10235 झाली आहे तर 7166 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2800 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 299 वर पोहोचला आहे.
-----------------------------------------------------
''सहा महिने तरी हे पाळाच''
सोशल संबध टाळा, सोशल मिडीयावर भेटा.
* नातेवाईक कितीही जवळचा असला तरी तुर्तास माया /मोह टाळा.
- ही वेळ भावनिक नाही तर वास्तविकता जाणून वावरण्याची आणि जगण्याची आहे.
* जवळचेच कोरोनाला जवळ आणून सोडतील, तेव्हा राग आला तरी चालेल स्पष्टपणे भेटण्यास येवू नका असे कळवा.
- तसेही स्पष्ट बोलणारे अतिशहाण्यांच्या मते वेडेच वाटतात.
* अति गरजेचे असल्याशिवाय आपण स्वत:हुन कोणाकडे जावू नका.
- कारण आता तुम्हाला छान वाटेल कोणाच्या घरी जायला पण तिथे कुणी रुग्ण आहे हे कळेल तेव्हा तुम्ही इच्छा असूनही मदतीला जावू शकणार नाही.
* कोरोना कुणाच्या मदतीने केव्हा घरात येईल सांगता येत नाही.
- तुमची एक चुक तुम्हांला आणि दुसऱ्याला महाग पडेल हे लक्षात ठेवा,जेव्हा कोणाला खरी गरज असेल तेव्हा तुम्हीही पाठ फिरवाल कारण हा विषाणू तसाच आहे,केव्हा होत्याच नव्हतं करेल सांगता येत नाही.
* कोरोनाग्रस्त रूग्णांपासुन शारिरीकदृष्ट्या दुर व्हा मनाने मात्र जवळच रहा.त्यांना आधार द्या आम्ही तुमच्या सोबतच आहोत याची ग्वाही द्या.
- कारण तेव्हा त्यांना तुमच्या खऱ्या मदतीची, प्रेमाची आणि आपुलकीची गरज आहे.
* ज्यांच्या घरात लहान मुले व ६० वर्षावरील माणसे आहेत यांनी विशेष काळजी घ्यावीच.
- लहान मुलं आणि वयस्कर माणसांच्या घरात किंवा जवळही जावू नये,कारण त्यांना काही झाले तर तुम्ही स्वतःला कधीच माफ करु शकणार नाही.
* अति व फाजील आत्मविश्वास बाळगू नका.
- कारण फाजील आत्मविश्वास हा फाजीलच असतो,मला काही होणार नाही ,होत नाही होवूनही गेला गेला असेल हे फालतू वक्तव्य बंद करा.जगा आणि जगू द्या आणि मरायची हौसच असेल तर कोरोनाची वाट कशाला बघताय.
* कसला कोरोना होतोय अशी बेजबाबदार भाषा अलिकडे दिसु लागली आहे.अशा लोकांना आवरा त्यांना टाळा किंवा समजावा.
- ज्याची भाषाच बेजबाबदार त्याला समाज किंवा परिवार याची जबाबदारी काय कळणार. सजग नागरिक म्हणून जगायला शिका.
* हात देणे, अलिंगण देणे, गळ्यात पडुन रडणे लहान मुलांचा पापा घेणे-देणे टाळाच. नाही बंदच करा.
- थोडे दिवस गळ्यात नाही पडले तर काय होईल,नका ना घेवू लहान मुलांना जास्त जवळ, जेणेकरुन त्यांना तुमच्या कडून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या.
* जिथे गोतावळा तेथे रमतो कोरोना.
- हे आज जरी खोट किंवा गमतीशीर वाटत असेल तरी ते कस खरं आहे हे पटण्यासाठी विषाची परीक्षा नका नां घेवू.
* जर अकारण कुणी आपल्या घरी येणे जाणे करत असेल तर प्रेमाने महत्व समजून सांगा.
- बाबारे तु तुझ्या घरी सुखी रहा आम्हांला आमच्या घरात सुखी राहू दे.खर म्हणजे तु जग आम्हाला जगू दे.
* भिडस्तपणा अंगाशी येण्याचीच शक्यता जास्त आहे.
- भिडस्तपणा अंगाशी येईपर्यंत नका ना वाट बघु,कदाचित् तोवर उशीर झालेला असेल किंवा वेळ निघुन गेलेली असेल.
* कमी सदस्य असलेली घरे सुरक्षित आहेत.
- आतातरी हेच सुरक्षित आणि सुशिक्षित पणाच लक्षण आहे.जिथे होते गर्दी तिथे कोरोना लावतो आपली वर्दी (हजेरी).
* वरील सर्व कठीण आहे पण सर्वासाठी ते आवश्यकच आहे.
- कारण तुमच्या आजूबाजूला कधीही, केव्हाही,कुठेही तो येवून शिरकाव करु शकतो.
* पोलीसानी, डाॅक्टरांनी, व नर्सेसनी आपले जीवन धोक्यात घालून आपणास वाचवले आहे. वाचवत आहेत तेव्हा आपण स्वत:हून आपली काळजी घ्या.
- तुम्हाला स्वतःची काळजी नसेल तर जावूद्या,पण दुसऱ्याच्या जिवावर उठू नका.
* प्रतीकार शक्ती वाढेल असेच अन्न सेवन करा.
- तुम्हाला सोसेल तेवढच पण पौष्टिक खा.
* जगाल तरच जगवाल.
* वैचारिक संघर्ष फक्त कोरोनाशी आहे.
* वैयक्तिक कुणा माणसांशी नाही.....,,