कोरोना काळात लिक्विड ऑक्सिजनची टंचाई
डॉक्टरांनानीही व्यक्त केली हतबलता
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. यादरम्यान आता अचानकपणे लिक्विड ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा भासू लागला आहे.अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांवर उपचार करणं शक्य नसून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात आहे.
ऑक्सिजन संपला आणि एका मिनीटासाठी जरी हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला, तर गंभीर रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे. त्यामुळे दाखल असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात आहे. पण त्यासाठीही रुग्णांना बेड मिळण्यात वेळ जात आहे. याशिवाय दुसरीकडेही ऑक्सिजन नसला तर रुग्णांच्या डोळ्यादेखत मृत्यू होताना पाहण्याखेरीज डॉक्टरांकडे कुठलाही पर्याय असणार नाही. मुंबईलगतच्या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात सध्या लिक्विड ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. बदलापूरच्या बॅरेज रोड परिसरातील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये तर भीषण परिस्थिती असून केवळ संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन उपलब्ध आहे.
हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढल्यानं औद्योगिक क्षेत्राला पुरवला जाणारा ऑक्सिजन पुरवठा कमी करण्याची मागणी आता केली जात आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत डॉक्टरांनानीही हतबलता व्यक्त केली आहे.
----------------------------------------------------
प्रथमच आयपीएलमध्ये खेळणार एक अमेरिकन क्रिकेटपटू !
आतापर्यंत आयपीएलमध्ये अमेरिकेचा एकही क्रिकेटपटू खेळलेला नव्हता. पण यावर्षीच्या आयीएलच्या हंगामात पहिल्यांदाच अमेरिकेचा एक खेळाडू पाहायला मिळणार आहे. आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून अली खान हा अमेरिकेचा खेळाडू खेळणार आहे.
कोलकाताच्या संघातील हर्नी गुर्ने या वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली होती. अली खान हा एक वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे हर्नीच्या जागी आता अमेरिकेच्या या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आले आहे. अमेरिकेध्येही क्रिकेटचा चांगला प्रसार करण्यात आला आहे. पण अमेरिकेचा एकही खेळाडू आतापर्यंत आयपीएलमध्ये पाहायला मिळाला नव्हता.
अली हा कॅरेबियन प्रीमिएर लीगमध्ये त्रिनबागो नाइट राइडर्स या संघातून खेळत होता. त्रिनबागो नाइट राइडर्स या संघाने यावेळी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्रिनबागो नाइट राइडर्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही संघांचा मालक हा शाहरुख खान आहे.
अली हा एक वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे यावर्षी तो कोलकात्याच्या संघातील सरप्राइज पॅकेज ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. वेगवान गोलंदाजीसाठी अली हा ओळखला जातो. त्याचबरोबर अली हा भन्नाट यॉर्कर टाकतो, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये अली संधी मिळणार का आणि तो या संधीचे सोने करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल.
----------------------------------------------------
निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण
मुंबई : आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार काल समोर आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे.
कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. काल दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. मारहाणीत मदन शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
यावेळी IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी प्रवीण दरेकर आणि आंदोलकांची भेट घेतली. आवश्यक त्या कलमांचा समाविष्ट करण्याचं आश्वासन पोलिसांकडून नांगरे पाटील यांनी दिलं. प्रवीण दरेकर आणि नांगरे पाटील यांची चर्चा सुरु असतानाच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दरेकरांना फोन आला. त्यांनीही आंदोलकांच्या मागणीची दखल घेतली.
असे आहे प्रकरण?
मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्याकडील ‘महानगर -1’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर राजकीय पुढार्यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र फॉरवर्ड केले. या कारणावरुन कमलेश कदम आणि इतर आठ ते दहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला मारहाण करत डोळ्याला दुखापत केली म्हणून समतानगर पोलीस ठाणे येथे कलम 325, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी सकाळी कोर्टात हजर केले असता सहाही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला.
“आपले वडील मदन शर्मा यांनी व्यगंचित्र फॉरवर्ड केल्यानंतर त्यांना अनेक फोन येत होते. त्यानंतर बिल्डींगबाहेर बोलावून त्यांना मारहाण करण्यात आली” असा दावा त्यांची कन्या डॉ. शीला शर्मा यांनी केला आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यात काही जण मदन शर्मा यांच्या मागे धावताना दिसत आहेत.
----------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज 6 रुग्णांचा मृत्यु झाला
आज प्राप्त झालेल्या 390 RTPCR अहवालांपैकी 144 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 159 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 87 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 364 Rapid Antigen Test पैकी 85 रुग्ण पॉझिटिव्ह तर 279 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 229 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 8275 झाली आहे तर 5890 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2147 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 238 वर पोहोचला आहे.
-----------------------------------------------------