आधी आरक्षण ; मगच भरती : संभाजी राजे // परिवर्तनवादी चळवळीचा झंझावात थांबला // लातुर 320 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 261 नवीन बाधित

आधी आरक्षण आणि मगच भरती! हीच मराठा समाजाची भूमिका : संभाजी राजे


मराठा समाजाच्या 13 टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एम पी एस सी’ ची किंवा आणखी कुठलीही परीक्षा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय भरती नको, अशी पोस्ट संभाजीराजेंनी फेसबुकवर टाकली आहे. मराठा समाज इतर कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. इतर सर्व समाज मराठा समाजाच्या सोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांनीसुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने प्राधान्य द्यावं हीच भूमिका घेतली आहे. त्यांचे मी समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो.



--------------------------------------------------------------------


|| भावपूर्ण श्रद्धांजली ||


परिवर्तनवादी चळवळीचा झंझावात थांबला.



प्राचार्य डॉ.  विद्यार्थिदशेपासून कार्य करणारे विद्यार्थी ,शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, अंगणवाडी कार्यकर्ते अशा विविध शोषित घटकांच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण आयुष्य झगडणारे प्राचार्य डॉ विठ्ठल मोरे यांचे दि.१८/९/२०२०रोजी पहाटे ३.०० वाजता दुःखद निधन झाले.मोरे सर म्हणून ते महाराष्ट्रात सर्व परिचित होते.स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी युवक संघटनांचे ते महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष होते.प्राध्यापकांच्या मुक्टा व एमफुक्टो या संघटनांचे पदाधिकारी राहिले असून विद्यापीठाच्या सिनेट, व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचेही ते सभासद राहिले आहेत. छात्र संघर्ष, युवा संघर्ष व क्रांतीज्योत या नियतकालिकांचे संपादक राहिले असून सध्या विचार मंथन या राज्यशास्त्र विषयातील संशोधन पत्रिकेचे प्रमुख संपादक होते. तसेच माकपचे मुखपत्र जीवन मार्ग या साप्ताहिकाच्या ते संपादक मंडळावर होते. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी जि. उस्मानाबाद येथे तीस वर्षे राज्यशास्त्राचे विद्यार्थीप्रिय, प्राध्यापक प्रिय, प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.शिवाजी महाविद्यालय रेणापूर जिल्हा-लातूर, व शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी. जि. लातूर येथे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. राज्यशास्त्र या विषयातील मौलिक योगदानाबद्दल त्यांना प्रा. दत्ता चौघुले स्मृती पुरस्कार ,स्वामी विवेकानंद पुरस्कार व विशेष सेवा योगदान व उपक्रमशील त्याबद्दल स्वामी विवेकानंद भूषण पुरस्कार मिळाले आहेत . त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचे फार मोठी हानी झालेली आहे.गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अडचणीला आयुष्यभर धावून जाणारे आणि कामगार, शेतकरी व शेतमजुरांच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे नेतृत्व काळाने हिरावले आहे. त्यांच्या या दुःखद निधन याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली.


-----------------------------------------------------------------


लातूर जिल्हा :




आज प्राप्त झालेल्या 448 RTPCR अहवालांपैकी 279 अहवाल निगेटिव्ह आले असून 126 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 724 Rapid Antigen Test पैकी 177 रुग्ण पॉझिटिव्ह तर 279 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 303 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 13774 झाली आहे, तर 10398 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1988 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 986 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 402 वर पोहोचला आहे.

 


----------------------------------------------------



उस्मानाबाद जिल्हा :


आज प्राप्त झालेल्या 349 RTPCR अहवालांपैकी 110 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 218 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 21 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 533 Rapid Antigen Test पैकी 151 रुग्ण पॉझिटिव्ह तर 382 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.


RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 261 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.                      जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 9846 झाली आहे तर 6957 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2616 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 273 वर पोहोचला आहे.







 


 




Popular posts
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
कोरोना रिपोर्ट चा घोळ अन् नगरच्या तरुणाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र ! आज लातूर जिल्हा141 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 104 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.
Image