लातूर जिल्हा :
लातूर : आज प्राप्त झालेल्या 233 RTPCR अहवालांपैकी 157 अहवाल निगेटिव्ह आले असून 47 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 24 अहवालांची पुनर्तपासणी करण्यात येईल. तसेच आज 709 Rapid Antigen Test पैकी 94 रुग्ण पॉझिटिव्ह तर 615 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोनही मिळून 141 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6580 झाली आहे, तर 4877 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1220 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 250 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 233 वर पोहोचला आहे.
------------------------------------------------------------
उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 232 RTPCR अहवालांपैकी 62 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 144 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 26 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 287 Rapid Antigen Test पैकी 42 रुग्ण पॉझिटिव्ह तर 245 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Test Rapid Antigen Test दोन्ही मिळून 104 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 4873 झाली आहे तर 2808 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1937 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 128 वर पोहोचला आहे.
--------------------------------------------------------
कोरोना रिपोर्ट चा घोळ अन् नगरच्या तरुणाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र !
मुख्यमंत्र्याकडे पाठवलेल्या पत्रात या २४ वर्षीय तरुणाने म्हटले आहे की, 'नगर शहर महानगरपालिकेतर्फे जी कोविड १९ अँटीजन (रॅपिड टेस्ट) तपासणी केली जाते, ही तपासणी खरंच कोविड सारख्या गंभीर महामारीचे निदान करते का? याबद्दल शंका आहे. मी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा प्रशासन, अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने आयोजित कोविड-१९ अँटीजन तपासणी उपक्रमांतर्गत जुने नगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणी केली. तपासणीनंतर दहा मिनिटांतच मला कोविड १९ ची लागण झाल्याचे सांगण्यात आले. मी खूप घाबरून गेलो व टेन्शन आले. परंतु मला चाचणीची शंका आली. कारण, तिथे प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्ह सांगत होते. मित्राशी चर्चा केल्यानंतर त्यानं मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्याचा सल्ला दिला. अजिबात विलंब न करता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो व तिथे स्वॅब दिला. दोन दिवसांनी, २३ ऑगस्टला सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट घेतला, त्यात मी निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. २४ ऑगस्टला मी पुन्हा रॅपिड टेस्ट केली, ती पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी करोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ? असा प्रश्न मला पडला आहे.'रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यानं मी उपचारसाठी जिल्हा रुग्णालय येथे गेलो, तर तिथले डॉक्टर बोलले तुम्ही निगेटिव्ह आहात. तुम्हाला उपचारांची गरज नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांनी वेगळाच सल्ला दिला. तुम्ही एचआरसीटी करा, हे रिपोर्ट आम्ही ग्राह्य धरत नाही. एचआरसीटी केल्यावर तुम्हाला नेमका काय त्रास आहे ते कळेल. पण माझ्या माहितीनुसार एचआरसीटीमध्ये निमोनियाची लक्षणे कळून येतात,' असं या तरुणानं पत्रात म्हटलं आहे.
'करोना टेस्टच्या नावावर जनतेची लूट सुरू आहे. त्यामुळे आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून सदर प्रकरणात योग्य ती कारवाई करावी व रॅपिड टेस्ट बंद करावी. मी स्वतः आता गोंधळून गेलेलो आहे की मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? या सर्व निगेटिव्ह, पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये माझे काही बरे वाईट झाले, तर सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल,' असंही या तरुणानं पत्रात नमूद केलं आहे . साभार - मटा