मराठा समाजातर्फे आज राज्यातल्या विविध ठिकाणी आंदोलन
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हंगामी स्थगिती दिल्यामुळे सरकारचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजातर्फे आज राज्यातल्या विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठवाड्यात काही ठिकाणी ध्वजारोहणासाठी आलेल्या मंत्र्यांना घेराव तर काही मंत्र्यांच्या घराबाहेर धरणं आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. मराठा समाजामध्ये अस्वस्थतेची भावना आहे. त्यामुळे आरक्षण टिकून रहावे यासाठी सरकारने, लोकप्रतिनिधीनी ठोस पावले उचलावी या कारणासाठी पुण्यात आज आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेली पोलीस भरती तत्काळ थांबवावी, अशा पद्धतीची मागणीदेखील यावेळी आंदोलकांनी केली. जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढच्या दोन दिवसात याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील बाभळगावमध्ये पालकमंत्री अमित देशमुख यांच्याही घराबाहेर आंदोलन झालं. अमित देशमुखांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. आंदोलनकांशी संवाद साधला संवाद. आंदोलकांकडून निवेदन स्विकारलं. त्यानंतर साडेतीन तासांनी आंदोलन संपलं. मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी बीड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झालं. हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन करुन परतणारे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मागण्या धनंजय मुंडे यांच्यासमोर वाचून दाखवल्या.
--------------------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 401 RTPCR अहवालांपैकी 157 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 230 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 14 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 465 Rapid Antigen Test पैकी 102 रुग्ण पॉझिटिव्ह तर 363 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 259 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 9568 झाली आहे तर 6871 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2428 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 269 वर पोहोचला आहे.