'श्रीमंत मराठा-गरीब मराठा' आणि मराठा आरक्षण ।। भारत-चीन ताबारेषेवर भारताची सरशी ।। लातुर 313 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 242 नवीन बाधित


'श्रीमंत मराठा-गरीब मराठा वादामुळे आरक्षण रखडले'


प्रकाश आंबेडकर यांचा मराठा आरक्षणासाठी सल्ला 


महाराष्ट्रातील श्रीमंत मराठा आमदारांना त्यांच्या समाजासाठी आरक्षण नको आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला.


त्यांनी ट्विट करून यासंदर्भातील आपली भूमिका मांडली आहे.


ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा. अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.


अन्यथा मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील : संभाजी ब्रिगेड


 केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे मराठा आरक्षणाचा बळी दिला जात आहे. पण आम्ही ५० कार्यकर्त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. प्रसंगी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकाही सादर करावी, असं सांगतानाच अन्यथा आरक्षण न मिळाल्यास मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.
मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कमी पडले. त्यामुळे राज्य सरकारने आपली चूक सुधारून लवकरात लवकर कोर्टात पुनर्विचार याचिका करावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेशही काढावा, असं संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी सांगितलं.

राम मंदिर, तीन तलाक आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेते, मग मराठा आरक्षणासाठी का घेत नाही? मराठा आरक्षण हा सुद्धा श्रद्धा आणि अस्थेचा विषय असून केंद्र आणि राज्याने आपल्या राजकारणात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.



----------------------------------------------------


भारत-चीन ताबारेषेवर भारताची सरशी. 


महत्त्वाची उंच ठिकाणे घेतली ताब्यात



यापूर्वी कुणीही न पोहोचलेल्या ठिकाणांकडे पीएलएच्या फौजा वाटचाल करत असल्याचे आपल्या नजरेला पडले असल्याने, चीनच्या या कृतीचा आपल्याला आधीच अंदाज आला होता, असे भारतीय लष्कराने सांगितले.पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या जवळजवळ ४ महिन्यांनंतर, २९-३० ऑगस्टच्या रात्री भारताने पहिल्यांदाच आपल्या डावपेचात्मक हालचालींनी चीनवर मात केली.



पहाट उजाडेपर्यंत भारतीय फौजांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याकडून शिरकाव करत प्रत्यक्ष ताबारेषेवरील काही महत्त्वाची अशी उंच ठिकाणे ताब्यात घेतली. या हालचालीमुळे, प्रत्यक्ष ताबारेषेवरील चिनी हद्दीतील ठाण्यांना धोका निर्माण झाला आणि या सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर भारताला जी माघार घ्यावी लागली होती, तिची भरपाई झाली.


मात्र, उंच ठिकाणावर पोहोचण्याच्या या मोहिमेसाठी एक महिन्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागले. फौजा माघारी घेण्याबाबत चीन गंभीर नसल्याची जाणीव झालेली असल्याने अशा प्रकारची कृती करण्याच्या योजनेसाठी दिल्लीहून राजकीय स्तरावर हिरवा कंदील मिळाला होता.



----------------------------------------------------


लातूर जिल्हा :




 आज प्राप्त झालेल्या 423 RTPCR अहवालांपैकी 318 अहवाल निगेटिव्ह आले असून 75 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 877 Rapid Antigen Test पैकी 238 रुग्ण पॉझिटिव्ह तर 639 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 313 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

 

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 12267 झाली आहे, तर 8805 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2393 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 714 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 355 वर पोहोचला आहे.

 


----------------------------------------------------



उस्मानाबाद जिल्हा :


आज प्राप्त झालेल्या 358 RTPCR अहवालांपैकी 122 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 201 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 35 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 466 Rapid Antigen Test पैकी 120 रुग्ण पॉझिटिव्ह तर 346 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.


RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 242 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 8541 झाली आहे तर 6003 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2292 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 246 वर पोहोचला आहे.








----------------------------------------------------






Popular posts
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
कोरोना रिपोर्ट चा घोळ अन् नगरच्या तरुणाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र ! आज लातूर जिल्हा141 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 104 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.
Image