सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार : अशोक चव्हाण
मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत त्यांना कोणताही फटका बसणार नाही.मात्र ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झालेले नाही त्यांच्यासंदर्भात सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय.
चव्हाण म्हणाले, आरक्षणाला राजकीय वळण देण्याचा काहींचा प्रयत्न आहे. अंतिम निर्णयापूर्वी मराठा समाजातील प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. तसेच काही जणांकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आरक्षणाबाबत मंगळवारपर्यंत पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मराठा आरक्षणावरील स्थगितीवर तोडगा काढण्यास सरकार सक्षम आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात अनेक घटनात्मक मुद्दे आहेत. केंद्र सरकारच्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे गेलेलं आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण देखील मोठ्या खंडपीठाकडे देण्याची मागणी केली होती. तर मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण देणे म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
----------------------------------------------------
रा.सु.का. अंतर्गत दाखल केलेले निम्याहून अधिक गुन्हे गोहत्येसंदर्भातील
एनएसए(National security Act) कायद्यानुसार पोलिसांना एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरु शकतो असं वाटलं तर ते एखाद्या आरोपीला कोणताही आरोप सिद्ध होण्यापूर्वीच १२ महिन्यांपर्यंत तुरुंगामध्ये ठेऊ शकतात. उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये गोहत्या प्रकरणातील एका आरोपीवर ६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये गोहत्या प्रकरणामध्ये एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची संख्या वाढली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एनएसए अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी अर्ध्याहून अधिक प्रकरणं ही गोहत्येशी संबंधित आहेत. साडे आठ महिन्यांमध्ये आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये १३९ जणांविरोधात एनएसएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनेक प्रकरण ही गोहत्येशी संबंधित आहेत.
अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश कुमार अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी १९ ऑगस्टपर्यंत उत्तर प्रदेश पोलिसांनी एनएसए अंतर्गत १३९ गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ७६ गुन्हे हे गोहत्या प्रकरणाशी संबंधित आहेत. सर्वाधिक प्रकरणं ही बरेली जिल्ह्यातील आहेत. ३१ ऑगस्ट पर्यंत बरेली पोलिसांच्या हद्दीमध्ये एनएसएअंतर्गत ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांपैकी सहा प्रकरणांमध्ये एनएसएअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात आंदोलन करणाऱ्या १३ जणांना या कायद्यानुसार अटक करण्यात आली. एनएसए कायद्यानुसार पोलिसांना एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरु शकतो असं वाटलं तर ते एखाद्या आरोपीला कोणताही आरोप सिद्ध होण्यापूर्वीच १२ महिन्यांपर्यंत तुरुंगामध्ये ठेऊ शकतात. “सार्वजनिक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशा प्रकरणांमध्ये एनएसएअंतर्गत कारवाई करावी असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. गुन्हेगारांमध्ये कायद्याबद्दल भीती निर्माण व्हावी आणि जनतेला सुरक्षेसंदर्भातील यंत्रणेवरील विश्वास वाढावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे,” असं अवस्थी म्हणाले. एनएसएशिवाय याच वर्षी २६ ऑगस्टपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये गोहत्या निवारण अधिनियमअंतर्गत एक हजार ७१६ गुन्हे दाखल झाले असून जवळवजळ चार हजार जणांना अटक करण्यात आली आहे.
----------------------------------------------------
स्वामी अग्निवेश यांचं निधन
सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीमधील रुग्णालयात निधन झालं आहे.
ते लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना दिल्लीमधील आयएसबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अखेर संध्याकाळी 6.45 वाजता डॉ. शिव सरीन यांनी अग्निवेश यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं.
त्यांचं पार्थिव सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील जंतरमंतर रोडवरील कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.त्यांच्यावर उद्या (शनिवारी) संध्याकाळी 4 वाजता गुरुग्राम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील असं बंधुआ मुक्ती मोर्चा आणि सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे कार्यवाह स्वामी आर्यवेश यांनी सांगितलं आहे.
१९७० मध्ये स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. १९७७ मध्ये हरियाणाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. दरम्यान २०११ मध्ये त्यांनी लोकपालसाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते. मात्र काही मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून दूर झाले होते.
----------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 317 RTPCR अहवालांपैकी 117 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 168 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत.32 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 336 Rapid Antigen Test पैकी 70 रुग्ण पॉझिटिव्ह तर 266 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 187 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
-----------------------------------------------------