गेल्या काही दिवसांमध्ये परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. अनेक भागांमध्ये नद्यांना पूर आल्याने मोठ्याप्रमाणावर शेतीचे नुकसान झाली आहे. संपूर्ण मराठवाड्याचा विचार करता यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे.पुढच्या 24 तासांत मराठवड्यासह काही भागांमध्ये पाऊस पडेल नांदेड, लातूर,उस्मानाबाद, बीड मध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात सरासरीच्या १००.८ टक्के पाऊस झालाय. या पावसामुळे अनेक परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाड्याची सरासरी ६७९ मिमी आहे. तर आत्तापर्यंत ५८५ मिमी पाऊस झाला.
मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा : संभाजी ब्रिगेड
मराठा आरक्षण वर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे संभाजी ब्रिगेडने मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या 340 कलमानुसार ओबीसीसाठी पात्र ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे संभाजी ब्रिगेडने मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या 340 कलमानुसार ओबीसीसाठी पात्र ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 203 RTPCR अहवालांपैकी 45 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 131 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 27 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 576 Rapid Antigen Test पैकी 156 रुग्ण पॉझिटिव्ह तर 420 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 201 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 10058 झाली आहे तर 7051 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2718 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 289 वर पोहोचला आहे.