अतिवृष्टीमुळे पीकाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा -राज्यमंत्री संजय बनसोडे// मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती// लातुर 285 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 104 नवीन बाधित


अतिवृष्टीमुळे पीकाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा -राज्यमंत्री संजय बनसोडे
मागील काही दिवसापासून सततच्या पावसाने पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तुर, मुग, सोयाबीन, या पीकाचा समावेश आहे या सर्व नुकसान झालेल्या पीकाचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल अशी माहिती



राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.


--------------------------------------------------


मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती.
मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती उठवण्यासंदर्भात राज्य सरकारने आज सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठासमोर विनंती अर्ज केला आहे. या प्रश्नावर राज्याने एक पाऊल पुढे टाकले आहे. मुख्यमंत्री या प्रश्नावर लवकरच सविस्तर भूमिका मांडतील अशी माहितीही दिली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सोमवारी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झालीत. सरकारने तातडीने कारवाई करत आरक्षणासाठी पावलं टाकावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.
राज्य सरकारसमोर तीन महत्त्वाचे पर्याय होते. त्यातून पहिल्या टप्प्यात सरकारने हा विनंती अर्ज केला आहे. नव्याने अध्यादेश काढायचा का, सुप्रीम कोर्टात त्याच खंडपीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल करावी का, मोठ्या घटनापीठाकडे दाद माघायची का. हे पर्याय होते.



काय आहे प्रकरण? देशातील सर्वच राज्यानी ५० टक्या पेक्षा अधिकच आरक्षण दिल आहे, सुप्रीम कोर्टाने आज पर्यंत कुठल्याही प्रकरणात स्थगिती दिलेली नाही. फक्त महाराष्ट्रासाठी वेगळा निर्णय का घेतला गेलाय, याच कारण शोधलं गेलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया मराठा आंदोलकांकडून येत आहेत. २०१८ तत्कालीन महाराष्ट्र सरकारने कायदा करून मराठा आरक्षण आणलं होतं. त्यानुसार शिक्षण संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजासाठी १६ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती.




----------------------------------------------------

मराठा समाज पुन्हा आक्रमक
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्य सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये तर पहिली जिल्हांबदीही करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी सोमवारी सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र सोमवारी पहाटेपासून माढा, निमगाव पाटी परिसरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकेच नाही तर पंढरपूर-पुणे मार्गावर टायरची जाळपोळकरून आंदोलकांनी महामार्ग रोखला आहे.


ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केला आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील हा पहिलाच बंद आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे.

------------------------------------------------------


लातूर जिल्हा :




आज प्राप्त झालेल्या 300 RTPCR अहवालांपैकी 178 अहवाल निगेटिव्ह आले असून 98 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 676 Rapid Antigen Test पैकी 187 रुग्ण पॉझिटिव्ह तर 489 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.  RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 285 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 14674 झाली आहे, तर 11262 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2015 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 962 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 435 वर पोहोचला आहे.

 


----------------------------------------------------



उस्मानाबाद जिल्हा :


आज प्राप्त झालेल्या 165 RTPCR अहवालांपैकी 41 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 107 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 16 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 281 Rapid Antigen Test पैकी 63 रुग्ण पॉझिटिव्ह तर 218 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 104 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 10392 झाली आहे तर 7325 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2760 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 307 वर पोहोचला आहे.






 




Popular posts
आज लातूर जिल्ह्यात 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
राज्यात करोनाग्रस्तांच्या मृत्यू चे प्रमाण वाढले, आज ३३९ मृत्यु, लातूर जिल्हा १२६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात १६१ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
Image