भारताने सावध व्हावे, अर्थव्यवस्थेचे पुढील अंदाज धडकी भरवणारे, लातूर जिल्हा 274 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 191 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण.

लातूर जिल्हा :


 

लातूर : आज प्राप्त झालेल्या 279 RTPCR अहवालांपैकी 149 अहवाल निगेटिव्ह आले असून 90 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 35 अहवालांची पुनर्तपासणी करण्यात येईल. तसेच आज 938 Rapid Antigen Test पैकी 184 रुग्ण पॉझिटिव्ह तर 754 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

 

RTPCR आणि Rapid Antigen Test  दोनही मिळून 274 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :

 

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 8701 झाली आहे, तर 6442 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1653 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 310 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 296 वर पोहोचला आहे.


 

----------------------------------------------------


उस्मानाबाद जिल्हा :


उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 207 RTPCR अहवालांपैकी 69 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 129 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 09 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 756  Rapid Antigen Test पैकी 122 रुग्ण पॉझिटिव्ह तर 634 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.


RTPCR आणि Test  Rapid Antigen Test दोन्ही मिळून 191 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :


जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6411 झाली आहे तर 4027 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2200 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 184 वर पोहोचला आहे.







-----------------------------------------------------------


भारताने सावध व्हावे, अर्थव्यवस्थेचे पुढील अंदाज धडकी भरवणारे ;


नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांची माहिती.


चीनची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करेल.



गीता गोपीनाथ 






एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ नव्हे तर अधोगती झाली.एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकासदर जीडीपी -२३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला. अनलॉकमधून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सरकार करत असले तरी दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी खोलात जाईल, असा भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) व्यक्त केले आहे.


देशात जवळपास अडीच महिने कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात देशात उद्योगधंदे ठप्प पडले. बेरोजगारी वाढली. देशांतर्गत वस्तूंचा खप कमी झाला. यामुळे वृद्धीला खीळ बसली. यावर नजर असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दुसऱ्या तिमाहीतील विकासदराचे केलेले भाकीत धडकी भरवणारे आहे.'जी-२०' देशांच्या समूहाचा एक भाग असलेल्या भारताची आर्थिक स्थिती आणखी कमकुवत असेल असे नाणेनिधीने म्हटलं आहे. दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी हा उणे २५.६ टक्के इतका खाली घसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आतापर्यंतची जीडीपीतील ही ऐतिहासिक घसरण असेल, असे नाणेनिधीने म्हटलं आहे.


नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्या मते चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी जी-२० समूहात सर्वात कमी राहील. जी-२० देशांवर करोनाचा परिणाम सुरूच आहे, असे गोपीनाथ यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.जी-२० देशांचा विकासदर दुसऱ्या तिमाहीत नकारात्मक राहील, असे त्यांनी म्हटलं आहे. २०२० मधील तिसऱ्या तिमाहीपासून यात अर्थव्यवस्था सुधारू लागेल.


दुसऱ्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजनुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर उणे १०.९ टक्के इतका राहील, असे म्हटलं आहे.याआधी मूडीज या संस्थेने करोनामुळे जी-२० देशांचा विकासदर मोठ्या प्रमाणात घसरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. जी-२० देशांमध्ये भारत, चीन यासारख्या विकसनशील देशांचा समावेश आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश`लोकसंख्या या जी-२० देशांचा हिस्सा आहे.







----------------------------------------------------------







Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image