पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचं काम विरोधकांनी बंद करावं,
जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आला आहे.
“महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठरावीक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात. बिहार निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले, आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहार मध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण, माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळे आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
कंगना राणौत प्रकरणावरुन बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कंगनाला राज्य सरकार निशाणा बनवत आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या होत आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना चांगलीच चपराक लगावली आहे. याबाबत रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना खुलं पत्र लिहिलं आहे. तुम्ही राजकारणासाठी सोपा मार्ग निवडत आहात याचे दु:ख आहे. फक्त राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर राज्यातील जनता कधीच सहन करणार नाही असा इशारा आमदार रोहित पवारांनी चिराग पासवान यांना दिला आहे.
----------------------------------------------------
सक्तीकेलेल्या दरांसह रुग्णालये सरकारनेच चालवावीत
मागण्या मान्य केल्या नाहीत तर डॉक्टर बेमुदत काम बंद करतील.
कोव्हिड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेल्या आणि मुळीच न परवडणाऱ्या दरात, लघु आणि मध्यम आकाराची खासगी रुग्णालये चालवताना यापुढे दैनंदिन खर्च भागवणे दिवसेदिवस अशक्य होत चालले आहे. मध्यम आकाराची सुमारे अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) समवेत झालेल्या बैठकीत सरकारने आयसीयूचे दर वाढवून देणे, जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट शुल्क आणि वीज बिलांमध्ये सवलती देण्याचे मान्य केले होते. डॉक्टरांसाठी पीपीई किट्स आणि मास्कचे दर नियंत्रणात आणून ते योग्य दरात उपलब्ध करून देण्याचेही सरकारने मान्य केले होते.
मात्र तसे न झाल्याने राज्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीत या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे आयएमए महाराष्ट्र प्रसिद्धीसाठी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
त्यानुसार, सरकारी अधिकाऱ्यांच्या जुलमी वर्तनाचा निषेध म्हणून आणि वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची धमकी डॉक्टरांना सतत देण्याच्या निषेधार्थ आयएमएच्या सर्व सदस्यांनी 11 सप्टेंबर रोजी मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीच्या प्रती महाराष्ट्रभरात जाळल्या.
उद्या 15 सप्टेंबरला आयएमए सदस्यांपैकी सर्व हॉस्पिटल मालक त्यांच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती विविध ठिकाणी आयएमए शाखा कार्यालयात जमा करणार आहेत.या शाखा महाराष्ट्र सरकारला आवाहन करतील की, सरकारने सक्तीकेलेल्या दरांसह रुग्णालये चालवणे त्यांना परवडणारे नाही आणि ही रुग्णालये सरकारनेच चालवावीत आणि स्वत: बनवलेल्या औषधाची चव सरकारने चाखलीच पाहिजे.
आयएमए महाराष्ट्र राज्याने 12 सप्टेंबर 2020रोजी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि दंतवैद्यकीय अशा सर्व पॅथींच्या २४ विविध वैद्यकीय संस्थांची बैठक बोलावली होती. सर्व संघटनांनी आयएमएच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून एकत्र काम करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सात दिवसांत सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर बेमुदत काम बंद करतील, यावर या बैठकीत एकमत झाले.
----------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 254 RTPCR अहवालांपैकी 75 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 139 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 38 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 396 Rapid Antigen Test पैकी 76 रुग्ण पॉझिटिव्ह तर 320 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 151 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 8697 झाली आहे तर 6553 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1892 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 252 वर पोहोचला आहे.
----------------------------------------------------