आमदारांनी अनुभवला सामान्य नागरिकांसारखा त्रास, चक्क जीडीपीच्या निधनाचीच शोकसभा! , लातुर 247 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 161 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण


आमदारांनी अनुभवला सामान्य नागरिकांसारखा त्रास; प्रवेशासाठी ताटकळले रांगेत 

मुख्यमंत्री दाखल होताच भाजप आमदारांची पायऱ्यांवर घोषणाबाजी.

विधानभवन परिसरात कर्मचारी आणि नेत्यांच्या रांगा.

38 कोरोना पॉझिटिव्ह आमदार अधिवेशनाला गैरहजर.

अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह. 


मुंबई : आजपासून विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोराना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्यांनाच अधिवेशनासाठी हजर राहता येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. परंतु, अनेकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल न मिळाल्याने त्यांना विधानभवनात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे विधानभवन परिसरात कर्मचारी आणि नेत्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या. अनेकांना विधानभवन परिसरात प्रवेश मिळवण्यासाठी खटाटोप करावा लागला.


आमदारांना लवकर विधानभवनात सोडा, अजित पवार यांची सूचना


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात कमालीचा संभ्रम पाहायला मिळाला. कारण अनेकांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल मिळाले नव्हते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळ परिसरात दाखल होताच, तेथे उपस्थित असलेल्या सर्व आमदरांनी त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. सर्व प्रकार ऐकून घेत अजित पवारांनी सर्व सिच्युएशन आपल्या हातात घेतली. सदर प्रकरणाची तत्काळ दखल घेत अजित पवारांनी विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना बोलावून घेतलं. तसेच सर्व आमदारांचे रिपोर्ट्स अद्याप का आलेले नाहीत, याबाबत
विचारणा केली. तसेच काही आमदारांनी वैयक्तिक चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे जर त्यांच्याकडे त्या चाचण्यांचे अहवाल असतील आणि ते नेगेटिव्ह असतील, तर त्यांना आतमध्ये सोडा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.


विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होताच, भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. हातात बॅनर घेऊन भाजप आमदार पायऱ्यांवर उपस्थित होते. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा, अशी मागणी भाजप आमदारांच्या वतीने करण्यात आली. मराठवाड्यातील भाजप आमदरांनी ही मागणी केली. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी आंदोलन करणाऱ्या आमदारांसमोर हात जोडले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन थांबलं.



दरम्यान, विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नियमांसह विधानसभेचं कामकाज सुरु झालं असून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे 38 आमदार विधिमंडळाच्या या अधिवेशनाला गैरहजर राहणार आहेत.



----------------------------------------------------

चक्क जीडीपीच्या निधनाचीच शोकसभा !

 मागील तिमाहीत झालेल्या जीडीपीच्या घसरणीनंतर विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. व्यक्तीच्या निधनानंतर शोकसभा भरवली जाते, हे सगळ्यांनाच माहितीये. पण, देशाचा जीडीपी घसरला म्हणून कधी कुणी शोकसभा आयोजित केल्याचं ऐकलंय का? हा प्रश्न आश्चर्यचकित करणारा असला, तरी हे घडलं आहे. ऑगस्टमध्ये आलेल्या जीडीपीच्या आकड्यानंतर काँग्रेसनं जीडीपी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित केली.ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात आलेले जीडीपी आकडे ऐतिहासिक ठरले. चार दशकात पहिल्यांदाच भारताच्या जीडीपीत मोठी घसरण झाली. आग्र्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपा सरकारविरोधात टीका करताना चक्क जीडीपीच्या निधनाचीच शोकसभा आयोजित केली.


यावेळी शोकसभेला उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यानं सांगितलं,”देशाच्या मृत पावलेल्या जीडीपीसाठी शोकसभा आयोजित केली आहे. २०२०-२१च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ उणे २३.९ टक्क्यांवर घसरला आहे. जगभरातील इतर सर्व मोठ्या अर्थव्यवस्थामधील ही सर्वात निच्चांकी आहे,” असं काँग्रेस नेत्यानं सांगितलं.


यावेळी अनेक काँग्रेस नेत्यांनी जीडीपीच्या पोस्टर समोर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर दोन मिनिटं स्तब्ध राहून शोक व्यक्त करण्यात आला.


----------------------------------------------------


लातूर जिल्हा :




लातूर :- आज प्राप्त झालेल्या 333 RTPCR अहवालांपैकी 201 अहवाल निगेटिव्ह आले असून 105 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 742 Rapid Antigen Test पैकी 142 रुग्ण पॉझिटिव्ह तर 600 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

RTPCR आणि Rapid Antigen Test  दोनही मिळून 247 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

 

 जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 10126 झाली आहे, तर 7194 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2223 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 386 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 323 वर पोहोचला आहे.

----------------------------------------------------


उस्मानाबाद जिल्हा :


उस्मानाबाद :-  आज प्राप्त झालेल्या 251 RTPCR अहवालांपैकी 77 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 145 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 29 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 507 Rapid Antigen Test पैकी 84 रुग्ण पॉझिटिव्ह तर 423 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.


RTPCR आणि Test  Rapid Antigen Test दोन्ही मिळून 161 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 7159 झाली आहे तर 4500 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2444 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 215 वर पोहोचला आहे.






-----------------------------------------------------







Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image