देशात सर्वाधिक रुग्ण संख्या पुणे जिल्ह्यात आहेत.कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये चिंता वाढली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडत आहे, कुठे काय चुकत आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी, प्रशासकीय गलथानपणा याबाबतही शरद पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शाळा घेत त्यांची चांगलीच कान उघाडणी केली.
बारामती हॉस्टेलवर झालेल्या या बैठकीला शरद पवार यांच्यासह केंद्रीय नेते प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या का वाढतेय? असा शरद पवार यांनी जाब विचारला. पत्रकार मृत्यू प्रकरण, त्याचबरोबर जम्बो कोविड सेंटरबाबत का त्रुटी आहेत, याबाबतही विचारणा केली आणि सूचना केल्या.शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांची तातडीनं बैठक बोलावली. कोरोनाबाबत पुण्यात स्थिती का बिघडतेय हे जाणून घेण्यासाठी ही बैठक होती.
देशात सर्वाधिक रुग्ण संख्या पुणे जिल्ह्यात आहेत. तरी घाबरून जायचं कारण नाही. कारण बरे होण्याचं प्रमाण पण अधिक आहे. चाचण्यांचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त सौरव राव यांनी यावेळी सांगितलं.
----------------------------------------------------
उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 172 RTPCR अहवालांपैकी 31 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 132 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 9 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 522 Rapid Antigen Test पैकी 93 रुग्ण पॉझिटिव्ह तर 429 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6555 झाली आहे तर 4310 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2050 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 195 वर पोहोचला आहे.
-------------------------------------------------------