मातोश्री बाँम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षा वाढवली. पहा सातबारा उताऱ्यातील हे 11 बदल, लातुर 336 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 201 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
मातोश्री बाँम्बने उडवून देण्याची धमकी? सुरक्षा वाढवली.




मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानावर काल रात्री 11 च्या सुमारास दुबईवरून अज्ञान व्यक्तीने फोन करून धमकी दिली आहे. उद्धव ठाकरे यांना ठार मारू आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. दुबईहून अज्ञात व्यक्तीने 4 फोन कॉल काल रात्री 11 च्या सुमारास मातोश्रीच्या लँडलाईनवर केले होते.



पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून मातोश्रीवर लँडलाईनला फोन कॉल कोणी केले आहेत? याचा आता तपास आता राज्य गुप्तचर विभाग आणि सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत. मातोश्रीवर आलेल्या फोन धमकीनंतर मातोश्री निवास्थानाची आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलीस सुरक्षा कमी केली होती. मात्र आता दुबईहून आलेल्या धमकीच्या फोन कॉलनंतर ठाकरे कुटुंबाची पुन्हा सुरक्षा वाढवण्यात आली आहे.



----------------------------------------------------


पहा सातबारा उताऱ्यातील हे 11 बदल




सातबारा उताऱ्यातील गाव नमुना-7 मध्ये कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे, याचा उल्लेख केलेला असतो, यालाच अधिकार अभिलेख असं म्हटलं जातं. तर गाव नमुना-12 मध्ये या जमिनीवरच्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकांची लागवड केली आहे, याची माहिती दिलेली असते, यालाच पिकांची नोंदवही असं म्हटलं जातं.


 हे आहेत 11 बदल :






  • शेती क्षेत्रासाठी 'हेक्टर आर चौरस मीटर' हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी 'आर चौरस मीटर' हे एकक वापरण्यात येणार आहे.

  • 'गाव नमुना-7' मध्ये गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच Local Government Directory टाकण्यात येणार आहे.

  • लागवडी योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे.

  • यापूर्वी खाते क्रमांक 'इतर हक्क' या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे.

  • यापूर्वी मयत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंस करून दाखवल्या जात होत्या. आता ही माहिती कंस करून त्यावर एक आडवी रेष मारून त्यांना खोडलेलं दाखवण्यात येणार आहे.

  • जे फेरफार प्रलंबित आहेत, ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे 'प्रलंबित फेरफार' म्हणून नोंदवण्यात येणार आहे.

  • गाव नमुना-7 मधील सर्व जुने फेरफार क्रमांक आता नवीन नमुन्यात सर्वात शेवटी 'जुने फेरफार क्रमांक' या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शवण्यात येणार आहे.

  • दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष काढण्यात येईल, जेणेकरूण खातेदारांची नावं स्पष्टपणे दिसतील.

  • गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सगळ्यात शेवटी 'शेवटचा फेरफार क्रमांक' आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे.

  • बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यावरील शेतजमिनीचं एकक 'आर चौरस मीटर' राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसंच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत.

  •  बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यात सगळ्यात शेवटी "सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-12ची आवश्यकता नाही" अशी सूचना देण्यात येणार आहे.





यापूर्वी 3 मार्च 2020 ला महाराष्ट्र सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली आहे.




परिपूर्ण सातबारा जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आणि राज्यातील सगळ्या जिल्ह्यांत एकसमानता आणण्यासाठी सातबारा उताऱ्यात बदल प्रस्तावित करण्यात आले होते. आता नवीन सातबाऱ्याच्या माध्यमातून अधिक माहितीपूर्ण सातबारा जनतेला उपलब्ध होईल आणि महसूल विभागाच्या कामकाजात अचूकता आणि गतिमानता येईल अशी आशा आहे.



----------------------------------------------------



लातूर जिल्हा :




लातूर :- आज प्राप्त झालेल्या 286 RTPCR अहवालांपैकी 200 अहवाल निगेटिव्ह आले असून 70 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 1046 Rapid Antigen Test पैकी 266 रुग्ण पॉझिटिव्ह तर 780 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

RTPCR आणि Rapid Antigen Test  दोनही मिळून 336 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

 

 जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 9879 झाली आहे, तर 6932 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2292 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 341 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 314 वर पोहोचला आहे.

----------------------------------------------------


उस्मानाबाद जिल्हा :


उस्मानाबाद :-  आज प्राप्त झालेल्या 247 RTPCR अहवालांपैकी 98 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 133 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 16 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 471 Rapid Antigen Test पैकी 103 रुग्ण पॉझिटिव्ह तर 368 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.


RTPCR आणि Test  Rapid Antigen Test दोन्ही मिळून 201 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


 जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6983 झाली आहे तर 4420 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2354 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 209 वर पोहोचला आहे.




------------------------------------------------------






Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image