उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 386 RTPCR अहवालांपैकी 109 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 256 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 21 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 605 Rapid Antigen Test पैकी 81 रुग्ण पॉझिटिव्ह तर 524 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6118 झाली आहे तर 3886 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2067 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 165 वर पोहोचला आहे.
-----------------------------------------------------------
आज राज्यात कोरोनाचे 15765 नवीन रुग्ण
राज्याचा मृत्यु दर 3.08%
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.32%
-----------------------------------------------------------
'10-15 वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायले' : एकनाथ खडसे
जळगाव : दहा पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांवर नाव न घेता हल्लाबोल केलाय. आपल्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता पुन्हा एकदा संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळाले आहे. 'राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार असल्याचं म्हणत खडसे यांनी टोला लगावला.
खडसे म्हणाले की, एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी मोठी मेहनत घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकुल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे, असं खडसे म्हणाले.
माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये, कधीतरी याचा स्फोट होऊ शकतो
मी गेली चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी तरी स्फोट होऊ शकतो असं मला वाटतं. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे. राज्यातील अनेक पक्षांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलो, त्या पक्षाला सोडून जावं असा कधीही मनात विचार आला नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या आघाडी सरकारचा विचार केला तर अजून एक दीड वर्ष उलथापालथ होईल असं आपल्याला वाटतं नाही. कारण आघाडी सरकारकडे सध्या आवश्यक संख्याबळ आहे. भाजपला जर सत्तेत यायचा असेल तर केवळ काही आमदार फोडून चालणार नाही, तर एखादा पूर्ण पक्ष भाजपमध्ये यायला पाहीजे. मात्र ही भाबडी आशा आहे, सध्या तरी असं होईल अशी परिस्थिती नाही, असं सांगत खडसे यांनी भाजपची पोलखोल केली आहे
-----------------------------------------------------------
PUBG गेमसह 118 App वर भारतात बंदी, केंद्र सरकारचा निर्णय
सध्या मोठ्या संख्येने खेळला जाणारा पबजी गेम, तसंच वीचॅट वर्क, वीचॅट रिडींग, लिविक, लुडो वर्ल्ड आणि मोबाईलमधील फोटो लपवण्यासाठी वापरले जाणारे गॅलरी वॉल्ट, गॅलरी लॉक या अॅप्सचा बंदी घातलेल्या यादीत समावेश आहे.
माहिती तंत्रज्ञान कायदा 69 A नुसार भारताचं सुरक्षा आणि सार्वभौमतेला धोका असल्याचं सांगत केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घातली आहे.
PUBG गेम बंद करा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संख्येने पालक करत होते. यासाठी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढून संबधित अॅप्सवर कारवाई करत असल्याची घोषणा केली. पबजी, वी चॅट, लुडो, वॉल्ट यांच्यासह तब्बल 118 मोबाईल अॅप्सवर भारताच्या इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे.
----------------------------------------------------------