माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

 माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. 16 जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. 91 वर्षीय निलंगेकरांनी दोनच दिवसांपूर्वी कोरोना वर मात केली होती. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.


त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. वय व मधुमेह लक्षात घेता त्यांची अधिक काळजी घेतली जात होती. मात्र आज पहाटे सव्वा दोनच्या सुमारास त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले.


आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी निलंगा येथे आणला जाणार असून, सायंकाळी सहा वाजता अंत्यविधी होणार असल्याचे समजते.



डॉ. निलंगेकरांचा अल्पपरिचय


माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा ०९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा, लातुर इथे जन्म  झाला.


ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ही होते.


एम.ए., एल.एल.बी. पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं.


दादासाहेब या नावाने ते सर्वांना सुपरिचित होते.


राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्यखात्याचे मंत्रीपदे त्यांनी सांभाळली. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही ते होते.


त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली.


०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री होते.


तसेच १९९०-९१मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.


त्यांचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय आणि कडक होता.


लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते.


------------------------------------------------------------


निलंगेकर साहेबांच्या  निधनाने लातूर जिल्हा पोरका झाला: दिलीपराव देशमुख


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस चे जेष्ठ नेते आणि मार्गदर्शक  आदरणीय निलंगेकर साहेब यांच्या दुःखद निधनाने लातूर जिल्हा  पोरका झाला आहे. ते मराठवाडा स्वातंत्र्य सेनानी आणि एक कुशल प्रशासक, व दूर दृष्टीचे नेते होते. राज्याच्या विकासात त्यांचं योगदान मोठं होतं. मी देशमुख परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.


दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व हरपले: उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


निलंगेकर यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढ्यात, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे नेतृत्व गमावले: अजित पवार


राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या निधनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणार महत्त्वाचं नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image