कोरोना कामकाजातून शिक्षकांना कार्यमुक्ती, शिक्षक संघाच्या पाठपुराव्याला यश.

उस्मानाबाद जि. प. अंतर्गत कोविड आजारासंबंधीत कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या शिक्षकांना कोविड संबंधित कामकाजातून कार्यमुक्त करण्याबाबतचा आदेश आज उस्मानाबाद जिल्हा परिषदेने निर्गमित केला असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे यांनी दिली.
        याबाबत सविस्तर वृत्त असे की,उस्मानाबाद जि. प. अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या सेवा कोविड कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र शासनाने शिक्षकांना ऑनलाईन अध्यापन व इतर शैक्षणिक कामकाजासाठी वेळ मिळावा यासाठी 17 ऑगस्ट 2020 रोजी शिक्षकांना कोविड संबंधित कामकाजातून कार्यमुक्त करण्याबाबत आदेश निर्गमित करून याबाबतचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते.



     त्याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,मार्गदर्शक एल बी पडवळ, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे,सरचिटणीस विठ्ठल माने व जिल्हा संघाचे पदाधिकारी यांनी दि 18 ऑगस्ट 2020 रोजी मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय कोलते, मा शिक्षणाधिकारी श्री रामलिंग काळे यांना शिक्षकांना कोविड कामकाजातून कार्यमुक्त करण्यासाठी निवेदन दिले होते. तसेच याबाबत पाठपुरावा केला होता. शिक्षक संघाच्या या प्रयत्नांना आज यश आले व जि. प. ने शिक्षकांना कोविड संबंधित कामकाजातून कार्यमुक्त करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.
   याबद्दल जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय कोलते साहेब, शिक्षणाधिकारी श्री रामलिंग काळे साहेब यांचे शिक्षक संघाच्या वतीने बाळकृष्ण तांबारे,एल बी पडवळ, सोमनाथ टकले, भक्तराज दिवाणे, अशोक जाधव,रामकृष्ण मते, संतोष देशपांडे, अर्जुन गुंजाळ,विठ्ठल माने, श्रीनिवास गलांडे, सुधीर वाघमारे, व्यंकट पोतदार, प्रदिप म्हेत्रे, बालाजी माळी,धनाजी मुळे,राजेंद्र बिक्कड, अनिल बारकुल, नीलकंठ इटकरी,राजेंद्र गव्हाणे, रवि कापसे, बालाजी मसलगे, रणजित पाटील,राहुल भंडारे, दत्ता पवार,संतोष मोळवणे,शिवाजी शिंदे,रामेश्वर शिंदे, डी डी कदम, सुदर्शन जावळे,तानाजी बिराजदार यांनी आभार व्यक्त केले आहेत.


------------------------------------------------*********************************----------------------------------------------



Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image