कोण शेतकरी फितकरी मला माहित नाही यापुढे मला शेतकऱ्यांनी फोन करायचा नाही. भाजीपाला चिखलात फेकून द्या नाहीतर कलेक्टर च्या दारात नेऊन टाका. मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही.
विनोद गुडे कव्हेकर
लातुर :- कोरोना माहामारी मुळे स्थलांतरित भाजी मार्केट येथे मुरुम टाकण्यावरून सभापती ललीतकुमार शहा यांच्या शेतक-याशी बोलताना गल्लीच्छ भाषेमुळे उद्दभवलेला शेतकरी व व्यापारी यांनी आज दि. २४ वार. सोमवार, रोजी नवीन भाजी मार्केट( गूळ मार्केट) या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ललीतकुमार शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी सभापती हाय हाय आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा. ललीतकुमार मुर्दाबाद आशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, नगरसेवक अजितसिंह पाटिल कव्हेकर, शेतकरी जोतीराम चिवडे, यांनी आपल्या तिखट शब्दात सभापती ललितकुमार शाहा यांचे कानपिचक्या देत निषेध नोंदवला. यावेळी
भाजी मार्केट आडत असोसिएशन चे सर्व पदाधिकारी, सर्व आडते मुनीम, हमाल आणि शेतकरी हे उपस्थित होते. यामध्ये भा. ज.पा. चे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, शहर अध्यक्ष गुरुनाथ मगे, मधुसूदन पारीख, अजय दुडिले, महेश कौळखेरे, ज्योतिराम चिवडे, तसेच इतर पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार व्यंकट पन्हाळे, विनोद कांबळे दिलीप आण्णा खराडे श्री ठोंबरे श्री झांबरे तसेच सर्व शेतकरी व्यापारी हामाल उपस्थित होते.