तज्ञांच्या मते एका व्यक्तीला दुसऱ्यांदा लागण होऊ शकते किंवा नाही हे स्पष्ट झालेलं नसलं तरी एकदा संसर्ग झालेल्या लोकांनी प्रतिकारशक्ती विकसित केली आहे, हे आपल्याला कळून येतं. सिरो सर्व्हेच्या माध्यमातून फक्त संसर्ग झाला होता आणि रुग्ण बरा झाला एवढंच कळू शकतं.
आपण संसर्ग म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवं. शरीराच्या आतल्या भागात एखादा परकीय जीव प्रवेश करून अवयवांना नुकसान पोहोचवण्यास सुरुवात करतो, त्याला आपण संसर्ग झाला असं म्हणतो. अशा स्थितीत शरीराने त्याचा प्रतिकार करणारी यंत्रणा विकसित केल्यास तो परकीय जीव शरीराला नुकसान पोहोचवू शकत नाही.
तर काही तज्ञांच्या मते ज्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित झाली आहे. त्यांना पुन्हा संसर्ग होणारच नाही. कारण त्यांच्या शरीरात त्या व्हायरसला रोखणारी यंत्रणा आधीपासूनच तयार झालेली आहे.
जगभरात 180 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. ताज्या माहितीनुसार, हा व्हायरस वेगाने आपलं स्वरूप बदलत चालला आहे. यालाच 'म्युटेशन' म्हटलं जातं.कोरोनाने स्वतःचं स्वरूप बदलल्यानंतर आधीच्या अँटीबॉडी आपलं संरक्षण करू शकतील का, हा प्रश्नही उपस्थित होतो.कोव्हिड-19 एक नवीन विषाणू आहे. या व्हायरसबाबत अजूनसुद्धा जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो किंवा नाही याबाबत संशोधन सुरू आहे.इन्फ्लुएन्झाची साखळी दरवर्षी बदलते आणि दरवर्षी नव्या साखळीची लागण लोकांना होते. त्यामुळे यावरची लस वर्षातून एकदाच प्रभावी ठरते. पण कोरोनामधील बदल हा चारवेळाच झालेला आहे. हा विषाणू प्राण्यामधून माणसांमध्ये आलेला आहे.