खा.मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सुचनेनुसार ग्रामविकास ना.हसन मुश्रीफ यांनी दि.१८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळा समवेत बैठक घेऊन, या शैक्षणिक वर्षात फक्त विनंती बदल्याच करण्यात येतील असे अभिवचन दिले होते.
त्या नुसार आज दि ५ आँगस्ट रोजी ग्रामविकास विभागाने विनंती बदल्या करण्याबाबत राज्यातील सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सुचित केले आहे .
त्या मुळे या वर्षी फक्त विनंती बदल्याच होणार आहेत.
या बद्दल खा.मा.शरदचंद्रजी पवार साहेब ,ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ साहेब व विशेष सहकार्य करणारे आ.रोहित दादा पवार यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मनस्वी हार्दिक आभार
'प्रश्न फक्त संघच सोडवू शकतो हे पुन्हा ऐकदा सिद्ध केले' अशा शब्दात शिक्षक संघाने भावना व्यक्त केल्या.