महाराष्ट्राचे मंत्री उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात.

आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. डॉ. राऊत यांनी स्वत: ट्वीट करत ही महिती दिली आहे.


डॉ. नितीन राऊत हे आझमगड सीमेवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. आपल्याला बांसा इथे जायचं आहे, असं राऊतांनी पोलिसांना सांगितलं. परंतु बांसामध्ये जाण्याची कोणालाही परवानगी नाही, त्यामुळे तुम्हाला तिथे जाता येणार नाही, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं. यानंतर आझमगड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि सर्किट हाऊस इथे नेलं.


काय आहे प्रकरण?
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशच्या आझमगडच्या बांसा गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. पप्पू राम यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी नितीन राऊत जात होते. काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी या प्रकरणाचं सत्य पडताळण्यासाठी एक सत्य-शोध समिती गावात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये नितीन राऊत यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू आणि काँग्रेस खासदार पीएल पुनिया हे देखील नितीन राऊत यांच्यासोबत उपस्थित राहणार होते.


अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींवरील अत्याचारांचे अनेक गंभीर प्रकरणं समोर आली आहेत. अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ राऊत यांनी देशभरात दलितांवरील अत्याचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचा विभाग पीडितांसाठी मदतीसाठी तत्परतेने काम करत आहे. तसंच त्यांना तात्काळ न्याय मिळेस यासाठीही काम करत आहे. यामुळे महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री असलेले नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशातील या प्रकरणाच्या सत्य-शोध समितीमध्ये सामील करण्यात आलं आहे.




Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image