राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज जीवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून लोकांची अहमदपूरमध्ये तुफान गर्दी झाली.
लातूर : कोरोना संसर्ग काळात जिल्ह्यातील अहमदपूर येथील एका मठात कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कारण होते राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे जीवंत समाधी घेणार असल्याची अफवा. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली अन् लोकांची तुफान गर्दी झाली.
अफवेवर विश्वास ठेऊ नये असे पोलीस प्रशासनाने वारंवार सांगूनही लोकांनी गर्दी केली. याचं कारण शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जीवंत समाधीची अफवा पसरली आणि हजारो लोक अहमदपूरला आले.
दरम्यान, मी असे काहीही करणार नसल्याचे स्वतः शिवलिंग शिवाचार्य महाराज स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही लोक जायला तयार नव्हते. पोलिसांनी लोकांना या ठिकाणावरुन अक्षरशः हाकलुन दिले.