लातूर जिल्हा :
लातूर : आज प्राप्त झालेल्या 278 RTPCR अहवालांपैकी 178 अहवाल निगेटिव्ह आले असून 24 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 46 अहवाल प्रलंबित असून 30 अहवालांची पुनर्तपासणी करण्यात येईल. तसेच आज 675 Rapid Antigen Test पैकी 102 रुग्ण पॉझिटिव्ह तर 573 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोनही मिळून 126 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6005 झाली आहे, तर 4218 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1328 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 248 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 211 वर पोहोचला आहे.
( पॉझिटिव्ह रुग्णांची यादी अपडेट झाली नाही.)
------------------------------------------------------------
उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 304 RTPCR अहवालांपैकी 97 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 151 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 56 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 799 Rapid Antigen Test पैकी 64 रुग्ण पॉझिटिव्ह तर 735 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Test Rapid Antigen Test दोन्ही मिळून 161 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 4223 झाली आहे तर 2452 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1651 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 120 वर पोहोचला आहे.
------------------------------------------------------------
* आज राज्यात 14 हजार 161 नवीन रुग्णांचे निदान.
* गेल्या २४ तासात राज्यात तब्बल 339 मृत्यु.
२४ तासांमध्ये ३०३ पोलीस कोरोनाबाधित, ५ पोलीसांचा मृत्यू
राज्यात गेल्या २४ तासांमध्ये आणखी ३०३ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून, पाच पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १३ हजार १८० वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ३८९ जण, कोरोनामुक्त झालेले १० हजार ६५५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १३६ जणांचा समावेश आहे.
राज्यातील १३ हजार १८० कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ३८७ अधिकारी व ११ हजार ७९३ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ३८९ पोलिसांमध्ये ३१३ अधिकारी व २ हजार ७६ कर्मचारी आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या १० हजार ६५५ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ६० व ९ हजार ५९५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३६ पोलिसांमध्ये १४ अधिकारी व १२२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.