दिलासादायक बातमी! गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के, मात्र महाराष्ट्रात पुन्हा विक्रमी रुग्णवाढ

मुंबई : 20 दिवसांत जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत होती मात्र एका दिवसांत आज दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 24 तासांत 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्र्यानं दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासांत 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्थांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्रात Coronavirus च्या रुग्णांमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा उच्चांकी वाढ झाली आहे. 14 हजारांवर नवे रुग्ण 24 तासांत दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या Covid-19 च्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,62,491 एवढी झाली आहे. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू होत असतानाच ही विक्रमी रुग्णवाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.


नवीन आकडेवारीनुसार देशात 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.





Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image