उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 297 RTPCR अहवालांपैकी 104 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 176 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 17 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 697 Rapid Antigen Test पैकी 101 रुग्ण पॉझिटिव्ह तर 596 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 5535 झाली आहे तर 3552 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1841 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 142 वर पोहोचला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------
पंढरपुरातील वंचितच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
पंढरपूरकडे येणारी सर्व एसटी सेवा बंद
राज्यातील धार्मिकस्थळं सुरू करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी एक लाख भाविकांसह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोर्चा काढण्याच्या वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या इशाऱ्याचा राज्य सरकारने प्रचंड धसका घेतला आहे. वंचितच्या उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे येणारी सर्व एसटी सेवा बंद करण्यात आली असून एसटी सेवा बंद करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्याने आज दिले आहेत.
पंढरपुरात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तावर वंचित बहुजन आघाडीने सडकून टीका केली आहे. कितीही रेलिंग किंवा बॅरिकेटिंग करा आम्ही विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक सोनावणे यांनी दिला आहे. आम्ही रेलिंग तोडून मंदिरात प्रवेश करू. विठ्ठलाचा दरबार उघडला तर राज्यातील करोना पळून जाईल. त्यामुळे सरकारने मंदिरं खुले करावीत, अशी मागणीही चंदनशिवे यांनी केली आहे. सरकारने वंचितच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रकार सुरू आहे. त्यासाठी पंढरपुरात रेलिंग लावण्यात आले असून एसटी सेवाही बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने एसटी सेवा बंद केली तरी आम्ही पंढरपुरात घुसूच. आम्हाल कोणीही रोखू शकत नाही, असं सांगतानाच पंढरपुरातील व्यापाऱ्यांनीही आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून तेही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे उद्या होणाऱ्या वंचितच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
-------------------------------------------------------------------------------------------
लो मॉलिक्यूलर वेट हेपरिन(LMWH) हे रक्त पातळ करण्यासाठी वापरलं जाणारं औषध कोरोनावर अत्यंत प्रभावी, पुण्यातील डॉक्टरांचा दावा.
पुणे - फुफ्फुसाच्या नसांत ब्लड क्लॉट तयार झाल्याने, अनेक वेळा श्वास घेण्यास त्रास होतो. या शिवाय, ब्रेन आणि किडनीमध्ये ब्लड क्लॉटिंगमुळेच हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक्स आणि अक्यूट किडनीची समस्याही निर्मण होते. अशात लो मॉलेक्यूलर वेट हेपरिनचा वापर ( LMWH ) परिणामकारक दिसत आहे.
पुण्यातील काही डॉक्टरांनी रक्तपातळ करण्यासाठी वापरले जाणारे एक औषध कोरोनावरील उपचारासाठी प्रभावी असल्याचे म्हटले आहे. या डॉक्टरांनी परीक्षण आणि रुग्णांमध्ये दिसून आलेल्या परिणामांच्या आधारे हा दावा केला आहे. डॉक्टरांनी म्हटले आहे, की लो मॉलिक्यूलर वेट हेपरिन ( LMWH ) नावाच्या इंजक्शनने कोरोना रुग्णांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. तसेच, त्यांच्यावर प्रभावी उपचार करण्यात मदत होते. या शिवाय या औषधाने अनेक रुग्ण रिकव्हरही झाले आहेत.
अनेक रुग्णांवर याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर, डॉक्टरांनी या औषधासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. यावेळी डॉक्टरांनी सांगितले, की SAFIS - Cov2 व्हायरसमुळे रुग्णांच्या शरीरात काउंटर ब्लड इंफ्लेमेशन आणि ब्लड क्लॉटिंगची समस्या निर्माण व्हायला लागते.
इटाली येथून आलेल्या रुग्णांच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे, की कोरोना व्हायरसमुळे, शरीरात छोटे ब्लड क्लॉट्स तयार होतात. अशात डॉक्टरांनी भारतात रक्त पातळ करणाया औषधांचा वापर करायलाही सुरूवात केली आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच गंभीर रुग्णांसाठी या औषधाचा वापर करण्यात येत आहे. तसेच आता रुग्णांची संख्या वाढत असल्याने या औषधाचा वापरही वाढवण्यात आला आहे. तसेच हे औषध प्रभावी असल्याचेही दिसून आले आहे. ब्लड क्लॉट्समुळेच अनेक गंभीर समस्या होतात तसेच यावर आणखी संशोधन करण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------
करोनाची साथ महाराष्ट्रात आली त्याला आता १७४ दिवस झाले असून , राज्यात करोना रुग्णांची संख्या सात लाख ५० हजार एवढी झाली आहे . यातील पाच लाख ५४ हजार रुग्ण बरे झाले असून , हे प्रमाण ७२.५८ टक्के एवढे असले तरी आजही १,८५,१३१ एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून , गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सुमारे १४ हजार असलेली करोना रुग्णांची संख्या तीन हजाराने वाढून आज १७ हजारावर पोहोचली आहे . यातील गंभीर बाब म्हणजे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही करोना आता पसरू पाहात असून मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याबाबत काही मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली .
-------------------------------------------------------------------------------------------