लातूर 153 तर उस्मानाबाद 46 पॉझिटीव्ह, उस्मानाबादसाठी मार्गदर्शक सूचना जारी.
लातूर जिल्हा


» प्राप्त तपासणी अहवाल  - 287


» निगेटिव्ह अहवाल  -  173


» पॉझिटिव्ह अहवाल RTPCR -  40 + Rapid Antigen Test Positive - 113 = 153


» प्रलंबित तपासणी अहवाल  - 0


» पुनर्तपासणी   - 36


» नाकारले  - 38


» Rapid Antigen Test Positive - 113


» Rapid Antigen Test - 461


» Rapid Antigen Test Negative - 348






» आज 40 पॉझिटिव्ह बाधित रुग्णांपैकी 2 बाधीत हे बाहेरील जिल्ह्यातील आहेत त्यामुळे लातूर जिल्ह्यातील आजचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 38 आहेत .


» एकूण 38 रुग्णांपैकी 35 रुग्ण पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून उर्वरित 3 रुग्ण हे नव्याने आढळून आले आहेत.


» तसेच आज एकूण 461 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण 113 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


 


* आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :


» आजपर्यंत एकूण मृतांची संख्या -  107


» रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या - 574


» Home Isolation Active - 20


» Rapid Antigen Test Positive रुग्ण दाखल असलेल्या बाधितांची संख्या - 499


» रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या - 1498


» आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या -  2698


  ---------------------------------------------------------------------


 

उस्मानाबाद जिल्हा


 

» प्राप्त तपासणी अहवाल  - 139


» निगेटिव्ह अहवाल  -  81


» पॉझिटिव्ह अहवाल  -  46


» प्रलंबित तपासणी अहवाल  - 38


» Inconclusive - 12




* आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :


» आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या -  1620


» रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या - 522


» रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या - 1040


» आजपर्यंत एकूण मृतांची संख्या - 58


------------------------------------------------------------------------


उस्मानाबाद जिल्ह्यात परिशिष्ट 1 व 2 प्रमाणे दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत मार्गदर्शक सूचना जारी


परिशिष्ट 1
1.चेहरा झाकणे:- सार्वजनिक ठिकाणी,कामाच्या ठिकाणी व प्रवासादरम्यान नागरिकांनी तोंडावर मारक/स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे.
२. सामाजिक अंतराचे पालन- सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी ६ फूट (२ गज की दूरी) अंतर ठेवावे. आस्थापना/दुकाने यांनी एका वेळी ५ पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात/आस्थापनेत उपस्थित राहणार नाहीत. तसेच ग्राहकांमध्ये शारिरिक अंतर राहील याबाबत दक्षता घेणे आवश्यक राहील.
३. मेळावे:- मोठे सार्वजनिक मेळावे/समारंभ यांच्यावरील निर्बंध कायम राहतील.
विवाहासंबंधीत मेळाव्यांमध्ये/समारंभांमध्ये ५० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही. अंत्यविधीच्या/अंत्ययात्रेच्या कार्यक्रमांमध्ये २० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही.
४. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास राज्य शासन/रथानिक प्रशासनाकडून कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
५. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू इ. तत्सम पदार्थांचे सेवन करण्यास परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणांबाबत अधिकच्या सूचना
६. घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम):- शक्य असेल तेथपर्यंत घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) या पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्य आस्थापनांचे ठिकाणी काम/व्यवसायाच्या तासांची सुनियोजितपणे आखणी करणे आवश्यक राहील.
७. तपासणी व स्वच्छता (Screening and hygiene):- सर्व प्रवेश व निर्गमनाचे ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, पुरेशा प्रमाणात हॅण्डवॉश व सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.
८. वारंवार निर्जंतुकीकरण:- कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी संपूर्ण जागा, सार्वजनिक सुविधा आणि मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा उदा. दरवाजाचे हॅण्डल इ. दोन्ही पाळ्यांच्या दरम्यानच्या कालावधीत करावयाच्या स्वच्छतेसह वारंवार निर्जंतुक होतील याबाबत दक्षता घ्यावी.
9. सामाजिक अंतराचे पालन:- कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होण्यासाठी कामगारांमध्ये पुरेसे अंतर दोन शिफ्टमध्ये पुरेसा अवधी ठेवण्यात यावा. तसेच कर्मचा-यांचे दुपारच्या जेवणाचे वेळी इ. ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी.
       परिशिष्ट २



*उस्मानाबाद जिल्हयात खालील उपक्रमावर प्रतिबंध असणार नाहीत. तसेच शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या प्रतिगंधात्मक आदेशाच्या अनुषंगाने खालील उपक्रम चालु ठेवण्यास परवानगी राहील. 



१. सर्व अत्यावश्यक दुकाने/ सेवा नियमित अनुज्ञेय वेळेनुसार सुरु राहतील.
२. जिल्हयाअंतर्गत बस सेवा शारीरीका अंतर ठेवून व निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजनेसह प्रवासी आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने जिल्हांतर्गत बस सेवा सुरु राहील.
३. आंतर जिल्हा प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध यापुढेही चालु राहतील.
४. अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त इतर सर्व आस्थापना /बाजारपेठा/ दुकाने सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत चालु राहतील.
५. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स,सिनेमागृहाव्यतिरीक्त सकाळी ०९,०० ते सायंकाळी ०७.०० या वेळेत दिनांक ०५ ऑगस्ट २०२० रोजीपासून सुरु राहतील. मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील फुड कोर्ट/रेस्टॉरंटस फक्त त्यांना घरपोच सेवा पुरविण्यासाठी सुरु ठेवता येतील. मात्र कोविड-१९ चा प्रादुर्भाव पसरु नये यासाठीच्या सबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करुन प्रमाणित कार्यपध्दतीचे त्यांनी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
६. महाराष्ट्र शासन आदेश दिनांक २३ जुन २०२० मधील तरतुदीनुसार मोकळया जागेत, लॉन्स, मंगल कार्यालयात, विनावातानुकूलित हॉल मध्ये लग्न समारंभ व मेळावे पार पाडण्याबाबत दक्षता घ्यावी.
७. खुल्या मैदानात सर्व शारीरिक व्यायाम आणि क्रीडा प्रकार करताना सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करणे बंधनकारक राहील.
८. वृत्तपत्रांची छपाई व वितरण (घरपोच सेवेसह) सुरु राहील.
९. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक/प्रशिक्षण/कोचिंग क्लासेस इ. संस्था बंद राहतील. तथापी शैक्षणिक संस्था(विद्यापिठ/विद्यालये/महाविद्यालये ) येथील कार्यालये/कर्मचारी यांना प्रत्यक्ष अध्ययनाशिवाय ई-सामुग्री तयार करणे (Development of e-content), उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आणि इतर संशोधन कामकाज करण्यासाठी मुभा असेल.
१०. राज्य शासनाचे आदेश दिनांक २५ जुन २०२० मधील अटी व शर्तीसह केशकर्तनालये /स्पाज, सलून्स,ब्यूटी पार्लर्स चालु ठेवण्यास परवानगी राहील.
११. वैयक्तिक खेळ (संघाशिवाय) उदा. गोल्फ कोर्स, आऊट डोअर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक, टेनिस, आऊट डोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब यासारखे खेळांना शारीरिक अंतर राखणे व निर्जंतुकीकरणाचे नियम पालन करण्याच्या अधीन राहून दिनांक ०५ ऑगस्ट २०२० पासून परवानगी असेल. मात्र जलतरणतलाव सुरु ठेवण्यास परवानगी असणार नाही.
१२. सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना खालीलप्रमाणे प्रवासी अनुज्ञेय राहतील.
1.दुचाकी वाहन १+१ हेल्मेट व तोंडावर मास्क लावून.
2.तीन चाकी वाहन १+२ फक्त अत्यावश्यक कामासाठी.
3.चार चाकी वाहन १+३ फक्त अत्यावश्यक कामासाठी.
वरीलप्रमाणे वाहतुक करताना सर्व प्रवाशांनी मारकचा वापर करणे बंधनकारक आहे.
१३. वरील अ.क्रं. १ ते १२ मधील बाबीशिवाय यापुर्वी विशेष / सर्वसाधारण आदेशाव्दारे परवानगी देण्यात आलेल्या बाबी अनुज्ञेय असतील.
      सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
सदर आदेश दिनांक ०३ ऑगस्ट २०२० रोजी ००.०० वा. पासून लागू करण्यात येत आहे.
                                     
                                   
                  मुरुम नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू 



     महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम, २०२० प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. ३ नुसार करोना विषाणुमुळे (COVID-१९) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
            कोरोना विषाणू कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहेत.त्या अनुषंगाने शासनाने राज्यात लॉकडाऊन  दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत  वाढविण्यात आलेला आहे.  लॉकडाऊनमधील निर्बंधाची सुलभता आणि लॉकडाऊन टप्पानिहाय उघडणे (Easing of restrictions and phase wise opening of  lockdown Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
    त्याअर्थी,उस्मानाबाद जिल्हयातील मुरुम नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करणे व त्यावर नियंत्रण आणण्याची कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे.त्याकरिता कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी मुरुम नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करणे आवश्यक झाले असल्याची माझी खात्री झाली आहे.
    त्याअर्थी मी जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबाद फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3),साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधित तरतुदी अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपुर्ण  मुरुम नगर पालिका क्षेत्रात दि.02 ऑगस्ट 2020 च्या 00.00 वाजेपासून ते दि.10 ऑगस्ट 2020  च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करीत आहे.या कालावधीत नागरिकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.या कालावधीत करोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायोजना एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील मुरुम नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून उर्वरित आस्थापना बंद राहतील.
1.फिरते दुध विक्रेते यांच्या मार्फत घरपोच दुध/दुध पाकीटांची विक्री/वितरण करता येईल परंतु एका ठिकाणी उभे राहुन दुध विक्री करता येणार नाही.घरपोच दुध/दुध पाकिटे वाटपाच्यावेळी कोरोना विषाणू कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच घरपोच दुध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 पर्यंत राहील.
2.सर्व सरकारी व खाजगी रुग्णालये,दवाखाने व त्यांचेशी संलग्न मेडीकल स्टोअर्स चालू राहतील.
3.जार,वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांडयामधे पाणी दयावे आणि त्यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे.किंवा जार,वॉटर स्पलायर्स यांनी कर्मचारी  यांना त्यांचे ओळखपत्राआधारे परवानगी राहील.
4) घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेल्या कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे.
5) वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा चालु राहतील.
6) सर्व शासकीय कार्यालय व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरु राहतील. या कार्यालयाचे/विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे नगर पालिका क्षेत्रात प्रवास करु शकतील.संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक शासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालयांतील कर्मचा-यांची उपस्थिती 10 टक्के राहील.
7) मुरुम नगर पालिका क्षेत्रातील नागरीकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापी अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरीकांनी  www.covid19.mhpolice.in  या संकेतस्थळावर अर्ज करावा.
8) मुरुम नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरीकांनी कोरोना विषाणुचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळुन आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.
9) विद्युत सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणा-या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना ओळखपत्राआधारे परवानगी राहील.
10) अंत्यविधीसाठी 10 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
11) पेट्रोल / डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणा-या कर्मचा-यांचा वाहनांना व शासकीय वाहनांसाठीच सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सुरु राहील. ओळखपत्राची पडताळणी करुनच पेट्रोल / डिझेल वितरित करण्यात यावे. पेट्रोल / डिझेल पंपावर काम करणा-या कर्मचा-यांना पेट्रोल / डिझेल पंप चालकांनी दिलेल्या ओळखपत्राअधारे परवानगी राहील.
12) किराणा दुकाने व भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत परवानगी राहील.
13) बी बियाणे व खते, किटकनाशके या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने/आस्थापना, बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू राहतील.
14)पिकविमा व अंतर्गत कामकाजाकरिता सर्व बँका सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहतील.
15)प्रशासनाच्या पूर्व परवानगी शिवाय कोण-याही धार्मिक/यात्रा मेळावे/लग्न समारंभ/विविध प्रकारचे प्रदर्शने/आठवडी बाजार/जनावरांचे बाजार भरविणे इ. आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे.
      सदरील आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडुन या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व आरतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.


 





Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image