उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 260 RTPCR अहवालांपैकी 86 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 125 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 49 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 243 Rapid Antigen Test पैकी 49 रुग्ण पॉझिटिव्ह तर 194 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 5005 झाली आहे तर 2908 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1966 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 131 वर पोहोचला आहे.
-----------------------------------------------------------------------------------
राज्यात दिवसभरात १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची भर
राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८ ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे .
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे . राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १४ हजार ८८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९५ जणांचा मृत्यू झाला आहे . राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८ ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . याशिवाय , २४ तासांत राज्यात ७ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६९ टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार २७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११ ( १८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत . सध्या राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर 33 हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख ७२ हजार ८७३ रुग्ण अक्टिव्ह आहेत.