उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 250 RTPCR अहवालांपैकी 82 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 141 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 27 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 894 Rapid Antigen Test पैकी 118 रुग्ण पॉझिटिव्ह तर 776 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 4422 झाली आहे तर 2508 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1792 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 122 वर पोहोचला आहे.
------------------------------------------------------------
* आज राज्यात 14 हजार 492 नवीन रुग्णांचे निदान.
* गेल्या २४ तासात राज्यात तब्बल 297 मृत्यु.
माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत अर्ज करताना चुकीची माहिती दिल्याचा आरोप अभिषेक हरिदास यांनी केला होता. तसंच याबाबत तक्रार करत त्यांनी पुणे न्यायालयात याचिका दाखल केली होती.
निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चौकशी करावी, असे आदेश पुणे न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी पोलिसांना दिले आहेत. यावर 15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करावी, असंही न्यायालयाने म्हटलं.
त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पण सदर तक्रार आपल्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.