उद्यापासून काय चालू व बंद , जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश जाहीर

आज पर्यंतच्या अध्यादेशानुसार माननीय जिल्हाधिकारी लातूर यांनी  25 जुलै ते 31 जुलै पर्यंत नव्याने आदेश काढला असुन, त्या दरम्यान चे  काळात काय चालू व बंद असेल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे.. 


खालील सेवा बंद राहतील. 


भाजीपाला व फळाची ठोक व किरकोळ विक्री बंद राहील. 


ऑनलाइन पदार्थ मागवणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहील. 


उपहारगृह, बार ,लॉज ,हॉटेल, रिसॉर्ट, मॉल बंद राहील. 


केश कर्तनालय ,सलुन, ब्युटी पार्लर दुकाने बंद राहतील. 


मटन चिकन अंडी मासे आदींची विक्री संपूर्णतः बंद राहील. 


शाळा, महाविद्यालय ,शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था ,शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. 


सार्वजनिक व खाजगी वाहने दोन चाकी, तीन चाकी ,चार चाकी संपूर्णतः बंद राहतील. 


सार्वजनिक, खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो ,ट्रॅक्टर इत्यादी संपूर्ण बंद राहतील . 


धार्मिक स्थळे, सभा ,समारंभ, प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील. 


लातूर शहरातील सर्व खाजगी कार्यालय बंद राहतील. 


 


खालील प्रमाणे सेवा व सुविधा चालू राहतील. 


 किराणा दुकाने व ठोक विक्रेते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहतील. 


दूध विक्री व वितरण सकाळी दहा वाजेपर्यंत घरपोच पोहोच करणे सुरू राहील. 


खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा व पशुचिकित्सा सेवा नियमित वेळेत सुरू राहतील. 


ऑनलाइन औषध वितरण सेवा व दवाखान्यात बाबत असलेली औषध विक्री दुकाने 31/ 7 /2020 पर्यंत 24 तास सुरू ठेवता येतील, इतर ठिकाणी असलेले मेडिकल दुकाने 31/ 7 /2020 पर्यंत सकाळी 7 ते दुपारी बारा या कालावधीत सुरू ठेवता येतील. 


पेट्रोल पंप व गॅस पंप सुरू राहतील ,अत्यावश्यक सेवा साठी या सुविधा उपलब्ध राहतील. 


वर्तमान पत्राचे वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील. 


बी-बीयाणेआणि शेतीसाठी लागणारी औषधे सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. 


अंत्यविधीसाठी वीस व्यक्ती च्या उपस्थितीस परवानगी असेल. 


 शेतीच्या मशागतीसाठी मुभा असेल. 


स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील . 



 


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image