मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट पर्यंत नव्याने आदेश काढला असुन, त्या दरम्यान चे काळात काय चालू व बंद असेल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे..
लातूर शहर व लगतच्या काही गावांच्या ( गंगापूर पेठ, चांडेश्वर ,खोपेगाव ,कव्हा, कातपूर ,बाभळगाव, सिकंदरपुर ,बसवंतपूर, खाडगाव, पाखरसांगवी, कोळपा ,हरंगुळ बु, बोरवटी, मळवटी, वरवंटी, आर्वी, वासनगाव, हनुमंतवाडी, महाराणा प्रताप नगर) हद्दीत दिनांक 01/08/2020 ते 15/08/2020 या कालावधीत खालील बाबी लागू राहतील व दिनांक 15/08/2020 नंतरच्या कालावधीकरिता चे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील .
खालील सेवा बंद राहतील.
भाजीपाला व फळाची ठोक व किरकोळ विक्री बंद राहील.
ऑनलाइन पदार्थ मागवणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहील.
उपहारगृह, बार ,लॉज ,हॉटेल, रिसॉर्ट, मॉल बंद राहील.
केश कर्तनालय ,सलुन, ब्युटी पार्लर दुकाने बंद राहतील.
मटन चिकन अंडी मासे आदींची विक्री संपूर्णतः बंद राहील.
शाळा, महाविद्यालय ,शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था ,शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील.
सार्वजनिक व खाजगी वाहने दोन चाकी, तीन चाकी ,चार चाकी संपूर्णतः बंद राहतील.
सार्वजनिक, खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो ,ट्रॅक्टर इत्यादी संपूर्ण बंद राहतील .
धार्मिक स्थळे, सभा ,समारंभ, प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील.
लातूर शहरातील सर्व खाजगी कार्यालय बंद राहतील.
खालील प्रमाणे सेवा व सुविधा चालू राहतील.
किराणा दुकाने व ठोक विक्रेते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहतील.
दूध विक्री व वितरण सकाळी दहा वाजेपर्यंत घरपोच पोहोच करणे सुरू राहील.
खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा व पशुचिकित्सा सेवा नियमित वेळेत सुरू राहतील.
ऑनलाइन औषध वितरण सेवा व दवाखान्यात बाबत असलेली औषध विक्री दुकाने ३१/ ७ /२०२० पर्यंत २४ तास सुरू ठेवता येतील, इतर ठिकाणी असलेले मेडिकल दुकाने ३१/ ७ /२०२० पर्यंत सकाळी ७ ते दुपारी बारा या कालावधीत सुरू ठेवता येतील.
पेट्रोल पंप व गॅस पंप सुरू राहतील ,अत्यावश्यक सेवा साठी या सुविधा उपलब्ध राहतील.
वर्तमान पत्राचे वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील.
बी-बीयाणेआणि शेतीसाठी लागणारी औषधे सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
अंत्यविधीसाठी वीस व्यक्ती च्या उपस्थितीस परवानगी असेल.
शेतीच्या मशागतीसाठी मुभा असेल.
स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील.
नगरपालिका ,नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात या काळात खालील नियम लागू असतील.