100% गुण घेणारे 12 विद्यार्थी
लातूर येथील प्रकाशनगर भागातील सरस्वती विद्यालयाच्या इयत्ता 10वी च्या निकालात विद्यार्थ्यांनी या वर्षीही यशस्वी गरुडझेप घेतली आहे. विशेष बाब म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये 100 पैकी 100 गुण घेणारे तब्बल 12 विद्यार्थी आहेत. प्रति वर्षा प्रमाणे सरस्वती विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम ठेवत 2020 सालाच्या निकालात यशस्वी विद्यार्थ्यांच्या तालीकेत आपले मानांकन मिळवले आहे.
मार्च 2020 मध्ये 10 वी बोर्डाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आल्या. या परिक्षांच्या कालावधीत संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात कोरोनाचे सावट असल्याने या परिक्षांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. एसएससी बोर्डाच्या परिक्षेमधील शेवटचा पेपरही कोरोनाच्या महामारीमुळे घेण्याचे टाळले होते. घेण्यात न आलेल्या पेपरचे गुणांकन हे इतर विषयांच्या सरासरीनुसार निश्चित करण्यात आले.
सरस्वती विद्यालयाचे एकूण 647 विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. त्यापैकी 642 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल 99.22 लागला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये 90% पेक्षा अधिक गुण घेणारे 154 विद्यार्थी आहेत. त्याशिवाय विशेष प्राविण्य मिळवणारे 424 विद्यार्थी आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बालविकास शिक्षण प्रसारक मंडळ, लातूरचे अध्यक्ष आर.जी. राठी, सचिव एल.ई. भागवत, संचालक सी.के.साळुंके सर, उपाध्यक्ष बी.के.सूर्यवंशी, नाडे साहेब , शालेय समिती अध्यक्ष डॉ. लटूरीया आर.एन., शाळेचे मुख्याध्यापक के.एच. शेळके, उपमुख्यध्यापक साळुंके एस.के., पर्यवेक्षक साठे एन.पी., गायकवाड आर.जी., कुलकर्णी डी.आर. आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.