लातूर, दि.10: विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 63 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 09 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले असून व 10 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
दिनांक 09.07.2020 रोजी 43 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 14व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 16 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 274, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 328 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 32 आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 622.
जिल्ह्यात आज 16 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.