लातूर जिल्ह्यात 184 स्वाबपैकी 140 निगेटिव्ह, 34 पॉझिटिव्ह व 10 अनिर्णित.

लातूर, दि. 01:- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 50 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 36 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 04 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव सूर्यवंशी यांनी दिली.



 विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात सद्यस्थितीत एकूण 48 कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असुन त्यापैकी 26 रुग्ण कोरोना विलगीकरण कक्षात दाखल असून सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच 22 रुग्ण कोरोना अतिदक्षता विभागात असून त्यापैकी 07 रुग्णाची प्रकृती गंभीर आहे व उर्वरीत रुग्णांची प्रकृती सद्यस्थितीत ठीक आहे.  


आज या रुग्णालयातील 04 रूग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी एक रुग्ण 12 दिवस व्हेंटिलेटरवर होता व त्या रुग्णास मधुमेह हा आजार होता व उर्वरीत 02 रुग्ण 05 दिवस व्हेंटिलेटरवर वर होते त्यांना इतर आजार नव्हते अशी माहिती कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख डॉ. राम मुंढे यांनी दिली.


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image