लातूर 131 पैकी 112 निगेटिव्ह, 09 पॉझिटिव्ह तर 10 अनिर्णित.

लातूर, दि. 21(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज लातूर जिल्ह्यातील 131 स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 112 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह, 09 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह तर 10 व्यक्तींचा आवाहल अनिर्णित आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 71 इतकी आहे.


   विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 55 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 52 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 02 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत.



पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती गवळी नगर लातूर येथील आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव येथून 22 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 20 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली 78 वर्ष वयाची व्यक्ती अजिंक्य सिटी येथील रहिवासी आहे, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


     औसा तालुक्यातील 22 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी औसा शहरातील 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या 04 व्यक्ती या कालन गल्ली येथील पूर्वीच्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत तर 03 व्यक्ती या कारंजे गल्ली येथील आहेत. कारंजे गल्ली येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना बाधित असून पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


आज 05 रुग्णांना डिस्चार्ज. 


    आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून दोन रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून तीन रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालय प्रशासनाने घरी जाण्यासाठी सुट्टी दिली, अशी माहिती डॉ. ढगे यांनी दिली.


   सद्यस्थितीत कोरोना विलगीकरण कक्षामध्ये एकूण 27 रुग्ण भरती असून त्यापैकी अतिदक्षता विभागात एकूण 14 रुग्ण असून त्यामध्ये 04 रुग्ण व्हेंटिलेटरवर व 06 रुग्ण ऑक्सिजन वर आहेत व इतर 04 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच कोरोना विलगीकरण कक्षातील इतर 13 रुग्णाची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे अशी महिती प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे, कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. गजानन हलकंचे डॉ. विनायक सिरसाठ विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र विभाग व डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली.


    *जिल्ह्यात आज रोजी उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या एकूण 71, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 151 तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13 इतकी आहे.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image