लातूर जिल्ह्यातील 127 पैकी 112 निगेटिव्ह, 07 पॉझिटिव्ह व 08 अनिर्णित.

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 67, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 139 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11. 


 


लातूर, दि.18(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत एकूण 127 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 112 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 08 व्यक्तींचे अहवाल अनिर्णीत आहेत.


      127 स्वाब पैकी विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे.


   *पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती भोई गल्ली लातूर येथील असून एक व्यक्ती सुतमिल रोड लातूर येथील आहे व एक व्यक्ती माळकोंडजी ता. औसा येथील आहे. महानगरपालिकेकडून तापसणीसाठी आलेल्या स्वब पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ती व्यक्ती जुनी कापड लाईन लातूर येथील आहे. तसेच एक पॉझिटिव्ह व्यक्तीही निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील असून ही व्यक्ती परदेशातून आलेली आहे. एकुरगा तालुका जळकोट येथील एका व्यक्तीचा मृत्यू झालेला असून त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे,* अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.


     दिनांक 03.05.2020 रोजी रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील एकाच कुटुंबातील 50 व 40 वर्ष वयाचे दोन्ही रुग्ण या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी एका रुग्णास मधुमेह होता व दोघेही 12 दिवस अतिदक्षता विभागात होते. त्या दोन्ही रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांची आज रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे अशी माहिती डॉ. गजानन हलकंचे, कोरोना विलगीकरन कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैदकशास्त्र डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.


     जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 67, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 139 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 आहे.



Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image