लातूर दि:22- आज संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही हा संसर्गजन्य उपद्रव कमी व्हावा म्हणून टाळेबंदी घोषित केली आहे. आपण सर्व काटेकोरपणे ती पाळत आहोत. टाळेबंदीमुळे मानवाच्या मानसिक स्वास्थ्या सोबतच शारीरिक स्वास्थ्यातही बिघाड झालेले आढळून आले असून दयानंद शिक्षण संस्थेतील दयानंद कला महाविद्यालयाने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य दिलेले आहे. या लॉक डाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून Onlie Teaching या उपक्रमाची यशस्वी अमलबजावणी करीत विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाची माहिती देत त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न दयानंद कला महाविद्यालयाने पार पाडला आहे.
या सोबतच प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण व्हावे व त्यांचे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य बळकट व्हावे या दृष्टिकोनातून महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने बेसिक एक्झरसाईज व योगासन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सकाळी 06.00 ते 07.00 या वेळेत Online Connectivity द्वारे प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून प्रा.डॉ. नितेश स्वामी, प्रा.डॉ.प्रशांत दिक्षीत व विद्यार्थी यांनी बेसिक एक्झरसाईज व योगासन प्रात्यक्षिक करून घेतले. या उपक्रमाचे परिणाम व चांगल्या प्रतिसादामुळे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव रमेश बियाणी संयुक्त सचिव सुरेश जैन व सन्माननीय संचालक मंडळ यानी प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांना शब्द सुमनाने गौरान्वित केले.तसेच पुढील योजनांसाठी शुभेच्छा दिल्या
क्रीडा विभागांतर्गत सुरू करण्यात आलेला हा उपक्रम कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी ठरल्यामुळे सदर उपक्रमाची सांगता झाली.