लातूर :- पालकमंञी ना. अमित देशमुख यांचे बाभळगाव ता.लातूर येथिल हिरवेगार ऊसाचे फडात दोन बिबटे दिसल्याने परिसरात भिती निर्माण झाली आहे.
रविवारी सकाळी देशमुख यांचे शेतातील ऊसाचे फडात पुर्ण वाढ झालेले दोन बिबटे सालगड्यास दिसल्याचे सांगितले जाते, खुद्द पालकमंञ्याचे शेतात बिबटे दिसल्याने वनविभाग, पोलिस बिबट्यास पकडण्यासाठी जोराचे प्रयत्न करात आहेत. वन विभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत. एक बिबटा देशमुख यांचे ऊसाचे फडात तर एक शेजारीच असलेल्या बांबूच्या फडात असल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्याच्या पाऊलखुणा सापडतात माञ बिबटे सापडले नाहीत. हे दोन बिबटे नर- मादी असावेत अशीही चर्चा आहे.गेली आठ-दहा दिवसात आलमला, गंगापूर शिवारात बिबट्या दिसल्याची चर्चा होती, तिथेही वनविभागाने पिंजरे लावले होते.बाभळगाव भूसणी बॅरेज परीसरात मोठ्या प्रमाणात ऊस, पाणी असल्याने बिबट्याचा या भागात वावर असावा असेही बोलले जात आहे. पालकमंञ्यांचे ऊसात बिबट्या दिसल्याने त्याला पकडण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.
(फोटो संग्रहीत)