राज्यात ४ हजार ५९७ मद्य विक्री अनुज्ञप्ती सुरू...

मुंबई दि.15: गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्यात आली आहे. यापैकी नागपूर आणि लातूर येथील ४ हजार ८७५ ग्राहक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.



राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली.  


राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात ( 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी 4 हजार 597 अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.


राज्यात 24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.14 मे, 2020 रोजी राज्यात 84 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 45 आरोपींना अटक करण्यात आली असून  22 लाख 62 हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 24 मार्च, 2020 पासून दि.14 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,489 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,457 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 554 वाहने जप्त करण्यात आली असून रु.14.93 कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअप क्रमांक – ८४२२००११३३ आहे.  ई-मेल – commstateexcise@gmail.com असा आहे.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image