दिलासादायक बातमी! कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला, एकाच दिवसात 10,000 रुग्ण परतले घरी

नवी दिल्ली - झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग आता काहीसा कमी झाल्याची पॉझिटिव्ह बातमी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच आज 10,000 पेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.


कोरोनाचा गुणाकार आता मंदावला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी या आधी 10.5 दिवस लागत होते. आता हा दर 12 दिवसांवर आला आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.


इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वात कमी आहे. एकूण रुग्णांच्या केवळ 3.2 टक्के रूग्णांचा मृत्यू होतो, अशी सध्या आकडेवारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.



दरम्यान, शनिवारपर्यंत भारताने एकूण 10 लाख कोरोना टेस्ट केल्या आहेत. एका दिवसात जवळपास 74 हजार टेस्ट केल्या जात असल्याचंही हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.



Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image