मुंबई | राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास आमचा विरोध नाही. त्याची घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. मात्र ते शक्यच नाही. घटनात्मकदृष्ट्या तसं होऊ शकत नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
माझा मुद्दा वेगळा आहे. दिवा लावायला विरोध, टाळ्या वाजवायला विरोध, जे अत्यावश्यक सेवा करतात त्यांचं कौतुक करायला विरोध. उद्योगपती वाधवानला मात्र महाबळेश्वरला पाठवायला विरोध नाही. त्याबाबत बोललं की ते राजकारण झालं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
अजूनही दोन महिने आहेत. दोन महिन्यानंतरच अशी स्थिती येईल की आमदार नाही झाले तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल. मग आता मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्याची काय गरज होती?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आमचा उद्धवजींना राज्यपाल कोट्यातून आमदार होण्याला विरोध नाही, त्याची जी घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. पण ते शक्यच नाहीय, घटनात्मकदृष्ट्या ते होऊच शकत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.